एसटी कर्मचाऱ्याचा भरीत-भाकरीवर ताव | Nagpur | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नागपूर : एसटी कर्मचाऱ्याचा भरीत-भाकरीवर ताव

नागपूर : एसटी कर्मचाऱ्याचा भरीत-भाकरीवर ताव

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नागपूर : राज्य परिवहन महामंडळाच्या संपावर असलेल्या कर्मचाऱ्यांनी आज भरीत-भाकरीवर ताव मारला. एसटी महामंडळ शासनात विलीनीकरण करण्याच्या मागणीसाठी गेल्या ९ दिवसांपासून नागपुरातील कर्मचारी संपावर आहे. आगारातील आंदोलनस्थळी कर्मचाऱ्यांनी स्वत: जेवण तयार करुन ताव मारतात. आज कर्मचाऱ्यांच्या ताटामध्ये राज्यातील पारंपारीक मेनू भरीत-भाकरी पाहायला मिळाली.

आज नागपूर गणेशपेठ आगारातून एकंही बस सुटलेली नाही. बस आगारातील रेस्ट रुम बंद केल्याने बाहेर गावावरुन आलेले एसटी कर्मचारी बाहेर कडाक्याच्या थंडीत मुक्काम करतात. कर्मचाऱ्यांनी आज गणेशपेठ आगारात भरीत भाकरीचे जेवण तयार केले. रेस्टरुम बंद असले तरी बाहेर मिळेलं त्याने पोट भरु मात्र आमच्या मागणीवर ठाम आहोत, असा एसटी कर्मचाऱ्यांचा निर्धार आहे. नागपूरच्या गणेशपेठ, इमामवाडा, घाटरोड डेपोसमोरील आंदोलनकर्ते मंडपात बसून निर्णयाच्या प्रतिक्षेत आहे.

हेही वाचा: जळगाव : जिल्हा बँकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना रोख कर्ज

विलीनीकरणाच्या मागणीसाठी एसटी कर्मचारी राज्यभरात संप करीत असताना एसटी महामंडळातील सर्व शिकावू कर्मचारी वाहक-चालकांना नोटीस पाठवून कामावर तातडीने हजर होण्याचे निर्देश दिले आहे. यामुळे आंदोलनातील कर्मचाऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. दिवाळीच्या तोंडावर असंख्य प्रवाशांना वेठीस धरणारे महाविकास आघाडीचे नेते निव्वळ आरोप प्रत्यारोप करण्यात व्यस्त असल्याचा आरोप कर्मचाऱ्यांनी केला आहे.

शासनाला एसटी कर्मचाऱ्यांचा प्रश्न प्रलंबित ठेवून सर्वसामान्य प्रवाशांना त्रास देण्याचा प्रकार केल्या जात आहे. राज्यातील नेत्यांकडे दूरदृष्टीचा अभाव, आधुनिक तंत्रज्ञान वापराबद्दलची उदासीनता आदींकडे कानाडोळा होत असल्याने एसटी महामंडळाची चाके गाळातच रूतत चालली असल्याची प्रतिक्रिया एसटी कर्मचारी कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली.

२ हजारावर कर्मचाऱ्यांना नोटीस

एसटी महामंडळाकडून आतापर्यंत २ हजारावर एसटी कर्मचाऱ्यांवर कारवाईची नोटीस बजावली असून एसटी कर्मचाऱ्यांना त्रास देण्याचा प्रकार केल्या जात आहे. सध्याच्या घडीला नागपूर विभागातील एसटी कर्मचाऱ्यांना पकडून जवळजवळ ८५ हजार ३०० कर्मचारी संपात सहभागी झाले आहे. एसटी महामंडळाने कारवाईची नोटीस मागे घ्यावी,कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावर सकारात्मक निर्णय घ्यावा,अशी मागणी एसटी कर्मचारी कृती समितीने केली आहे.

loading image
go to top