पाझर तलावाला बाळासाहेब विखे पाटील यांचे नाव

The name of Balasaheb Vikhe Patil is Pazhar Lake
The name of Balasaheb Vikhe Patil is Pazhar Lake
Updated on

श्रीरामपूर ः पश्‍चिम वाहिनी नद्यांचे पाणी गोदावरीच्या तुटीच्या खोऱ्यात वळविण्यासाठी युती सरकारने मंजूर केलेल्या 50 हजार कोटींच्या आराखड्याला महाविकास आघाडी सरकारने कृतीत उतरविल्यास दुष्काळी भागाच्या संघर्षाला न्याय मिळेल, अशी अपेक्षा आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्‍त केली. 

जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष शालिनी विखे पाटील यांच्या पुढाकारातून जाफराबाद येथे झालेल्या पाझर तलावाचे नामकरण "लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील पाझर तलाव' असे करण्यात आले. त्याचे उद्‌घाटन व जलपूजनाच्या कार्यक्रमात विखे पाटील बोलत होते. माजी आमदार भानुदास मुरकुटे, नानासाहेब शिंदे, दीपक पठारे, नितीन भागडे, सोन्याबापू शिंदे, गिरिधर आसने, गोरक्षनाथ ताके, गणेश मुदगले, सरपंच संदीप शेलार आदी उपस्थित होते. 

विखे पाटील म्हणाले, ""गोदावरीच्या तुटीच्या खोऱ्यात पश्‍चिमवाहिनी नद्यांचे पाणी आणण्यासाठी (स्व.) बाळासाहेब विखे पाटील यांनी सरकारला सादर केलेल्या आराखड्यानंतर प्रत्यक्ष अंमलबजावणी झाली. दुष्काळी पट्ट्याला न्याय देण्यासाठी गतीने पावले उचलण्याची आवश्‍यकता आहे.

समन्यायी पाणीवाटप कायद्यामुळे पाण्यासाठी केलेला संघर्ष सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेला. संघर्षाला न्याय मिळण्याची वेळ आली आहे. राज्य सरकारनेही दुष्काळी भागासाठी काही पावले टाकली पाहिजेत.'' 

युती सरकारने गोदावरी खोऱ्यातील पाणीप्रश्‍नासाठी 50 हजार कोटींचा आराखडा मंजूर केला होता. त्याची अंमलबजावणी महाविकास आघाडी सरकारने करावी, तसेच ग्रामीण विकासासह शेतकऱ्यांनीही स्वयंपूर्ण होण्यासाठी सामूहिक प्रयत्न करावेत, असे आवाहन विखे पाटील यांनी केले. 

अध्यक्षीय भाषणात मुरकुटे यांनी, शाश्‍वत पाणी उपलब्ध झाल्यास मोठ्या संख्येने तयार केलेल्या कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यांचा लाभ शेतकऱ्यांना घेता येईल, असे सांगितले. 

संपादन - अशोक निंबाळकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com