
डॉ. चिखले पुढे म्हणाले, पाणी फाऊंडेशन स्पर्धेत राज्यात पिंपरी जलसेनचा दुसरा द्वितीय क्रमांक आला होता. त्यामुळे या गावाचा समृद्ध गाव योजनेत समावेश करण्यात आला आहे.
पारनेर (अहमदनगर) : पिंपरी जलसेनच्या ग्रामस्थांनी पाणी फाऊंडेशन अंतर्गत पाणलोटाचे राज्यातील जनतेला मार्गदर्शक असे खूप चांगले काम केले आहे. या गावाचा पाणलोटांच्या कामात राज्यात दुसरा क्रमांक आला असून ही कामे राज्याला आदर्शवत आहे, असे उद्गार नाशिकचे रोजगार हमी योजनेचे उपायुक्त डॉ. अर्जुन चिखले यांनी काढले.
"समृद्ध गाव" योजनेत जिल्ह्यातील १० गावांनी सहभाग घेतला असून त्यात पिंपरी जलसेनचा समावेश आहे. या योजनेच्या अंतर्गत रोजगार हमी योजनेतून नाडेप व शोषखड्यांचे कामे येथे सुरू आहेत, त्या कामांची पाहणी करण्यासाठी डॉ. चिखले आले असताना ग्रामस्थांशी बोलत होते. यावेळी तहसीलदार ज्योती देवरे, गटविकास अधिकारी किशोर माने, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रकाश लाळगे आदी उपस्थित होते.
(nashik deputy commissioner of employment guarantee scheme dr. arjun chikhale said that the work of pimpri jalsen pani foundation is ideal in the state)
डॉ. चिखले पुढे म्हणाले, पाणी फाऊंडेशन स्पर्धेत राज्यात पिंपरी जलसेनचा दुसरा द्वितीय क्रमांक आला होता. त्यामुळे या गावाचा समृद्ध गाव योजनेत समावेश करण्यात आला आहे. या निमित्ताने नाडेप व शोषखड्यांचे कामे देखील चांगल्या प्रकारे झाली असल्याचे ते म्हणाले.
येथील रोहयो च्या कामांची पाहणी केल्यानंतर त्यांनी समाधान व्यक्त केले. ग्रामस्थांनी पाणलोटाचे खूप चांगले काम केले आहे. येथील पानलोटाचे काम राज्यात आदर्शवत आहे. या गावाला डोंगर व पाणी अडवण्यासाठी चांगली वनसंपदा लाभलेली आहे. गावकरी याचा पुरेपूर वापर करत आहेत. सध्या सुरू असलेली नाडेप व शोष खड्यांची कामे पूर्ण झाल्यानंतर गावकऱ्यांना अनेक वैयक्तिक लाभ मिळणार असल्याचेही डॉ. चिखले यांनी सांगितले.
पिंपरी जलसेन येथे सुरू असलेल्या मियावाकी जंगल प्रकल्पाला देखील या संपूर्ण टीम ने भेट दिली. हे मियावाकी जंगल १८ महिन्यांत उभे राहणार आहे, या प्रकल्पाची माहितीही डॉ. चिखले यांनी घेतली. हा प्रकल्प पर्यावरणासाठी चांगला असून प्रत्येक गावात असे प्रकल्प उभे करणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले. यावेळी पिंपरी जलसेनचे सरपंच सुरेश काळे, ग्रामविकास अधिकारी सुनील दुधाडे, ग्रामरोजगार सेवक माऊली थोरात, ग्रामपंचायत कर्मचारी दिनेश शेळके उपस्थित होते.
(nashik deputy commissioner of employment guarantee scheme dr. arjun chikhale said that the work of pimpri jalsen pani foundation is ideal in the state)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.