National Unity Day
sakal
कोपरगाव : गुजरात येथे उभारण्यात आलेल्या सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याला (स्टॅच्यू आॅफ युनिटी) साक्षी ठेवून यंदाचा राष्ट्रीय एकता दिन सोहळा संपन्न होईल. येत्या ३१ आॅक्टोबर रोजी आयोजित करण्यात आलेल्या सोहळ्याचे प्रमुख अतिथी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर देशभरातील निवडक पथके बॅण्ड वादन करतील. त्यात संजीवनी सैनिकी स्कूलच्या बॅण्ड पथकाला संधी मिळाली आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने या शाळेला पत्र पाठवून ही माहिती दिली. हा संजीवनी सैनिक स्कूलचा नव्हे, तर महाराष्ट्राचा देखील बहुमान असल्याची प्रतिक्रिया संस्थेचे संचालक व या पथकाचे मार्गदर्शक सुमित कोल्हे यांनी व्यक्त केली.