Ahmednagar News : राष्ट्रवादी कामगार सेलचा ठिय्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ahmednagar News

Ahmednagar News : राष्ट्रवादी कामगार सेलचा ठिय्या

अहमदनगर : बंगाल चौकी रेव्हेन्यू कॉम्प्लेक्स येथे महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचे जिल्हा कामगार सुविधा केंद्राचे कार्यालय आहे. या कार्यालयात बांधकाम कामगार मोठ्या संख्येने आपल्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी येतात. येथे लाभार्थी कार्ड व बांधकाम साहित्य किट दिले जाते. मात्र, कार्यालयामध्ये कार्ड व बांधकाम साहित्य किट उपलब्ध नसल्याने तेथे जिल्हाभरातून बांधकाम कामगारांना चकरा माराव्या लागत असल्याच्या निषेधार्थ, राष्ट्रवादी कामगार सेलचे जिल्हाध्यक्ष गजानन भांडवलकर यांच्या वतीने सहायक कामगार आयुक्त यांच्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले.

यावेळी सामाजिक न्याय विभागाचे नीलेश बांगरे, कामगार जिल्हा उपाध्यक्ष वैभव म्हस्के, कामगार सेलचे जिल्हा कार्याध्यक्ष विशाल म्हस्के, सचिन होंडे आदींसह बांधकाम कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कामगार कल्याणकारी मंडळातर्फे बांधकाम कामगारांसाठी विविध कल्याणकारी योजना राबवल्या जातात.

मंडळाच्या कल्याणकारी योजनेचा लाभ घेण्यासाठी बांधकाम कामगार मंडळाकडे आपले नावनोंदणी करण्यासाठी जिल्हाभरातून कामगार येतात. नोंदणीनंतर त्यांना ओळखपत्र दिले जाते. त्यांना ओळखपत्र घेण्यासाठी बोलावून घेतले, परंतु ओळखपत्र दिले नाही.

कामगाराला हेलपाटा मारावा लागत असल्याने राष्ट्रवादी कामगार सेलच्या वतीने सहायक कामगार आयुक्त यांच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन केले. सहायक कामगार आयुक्त नितीन कवळे यांची भेट घेऊन चाललेला कारभार सांगून हा सुरळीत करण्याची मागणी केली. कामगारांना कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही. कामगारांचे बांधकाम किट व ओळखपत्र त्यांना बोलावून दिले जाणार असल्याचे सहायक कामगार आयुक्त यांनी सांगितले.

टॅग्स :NCPMovementAhmednaga