esakal | अण्णा हजारे, खासदार कोल्हे, आमदार लंके यांनी केलेल्या कामावरुन श्रेयवाद
sakal

बोलून बातमी शोधा

NCP Babaji Tarte press conference in Parner taluka

बेल्हे ते राळेगण थेरपाळ हा रस्ता हा अण्णा हजारे, खासदार अमोल कोल्हे व पारनेरचे आमदार निलेश लंके यांच्या प्रयत्नातून मंजूर झालेला आहे.

अण्णा हजारे, खासदार कोल्हे, आमदार लंके यांनी केलेल्या कामावरुन श्रेयवाद

sakal_logo
By
मार्तंड बुचुडे

पारनेर (अहमदनगर) : बेल्हे ते राळेगण थेरपाळ हा रस्ता हा अण्णा हजारे, खासदार अमोल कोल्हे व पारनेरचे आमदार निलेश लंके यांच्या प्रयत्नातून मंजूर झालेला आहे. परंतु या रस्त्याच्या कामाच्या मंजूरीचे केविलवाणी श्रेय घेण्याचा प्रयत्न तालुक्‍यातील काही टक्केवारी सम्राट पुढाऱ्यांनी चालवला आहे, अशी टीका पारनेर तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुका अध्यक्ष बाबाजी तरटे यांनी केली.

तरटे यांनी आमदार निलेश लंके यांच्या पारनेर येथील कार्यालयात पत्रकार परीषद घेतली. त्यावेळी तरटे बोलत होते. यावेळी माजी सभापती सुदाम पवार, ॲड. राहुल झावरे, निघोजचे सरपंच ठकाराम लंके, जवळ्याचे उपसरपंच किसनराव रासकर, आळकुटीचे सरपंच बाबाजी भंडारी, बाजीराव कारखिले आदी मान्यवर उपस्थीत होते. 
बेल्हे ते राळेगण थेरपाळ हा 39 किलोमिटरचा रस्त्याच्या डांबरीकरणासाठी हजारे यांच्यासह खासदार कोल्हे व अमदार लंके यांनी पाठपुरावा केला आहे. या कामाचे विनाकारण इतरांनी श्रेय घेऊ नये असेही तरटे म्हणाले. या वेळी तरटे यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना या रस्त्याबाबत केलेल्या पाठपुराव्याची काही कागदपत्रेही पत्रकार परीषेदेत दाखविली. 

या रस्त्याचा पाठपुरावा पुणे जिल्हा परीषदेचे जिल्हा परीषद सदस्य पांडूरंग पवार यांनी केला होता. त्याच बरोबर हा रस्ता राष्ट्रीय माहामार्ग व्हावा यासाठी हाजारे व तत्कालीन खासदार दिलीप गांधी यांनी प्रयत्न केले होते असेही तरटे म्हणाले. त्यानंतर बेल्हे राळेगण थेरपाळ ते शिरूर या राष्ट्रीय महामार्गासाठी निधी मिळावा याचा पाठपुरावा आमदार लंके यांनी आमदार झाल्यानंतर केला होता त्यासाठी त्यांनी गडकरी यांची भेटही घेतली होती. 

आमदार लंके यांनी आमदार झाल्यानंतर 24 जूनला गडकरी यांच्याशी पत्रव्यवहार केला होता. तसेच मागील पंधरा दिवसापूर्वी दिल्ली येथे त्यांची भेट घेतली होती. त्यावेळी लंके यांनी उर्वरीत राळेगण थेरपाळ ते गव्हाणवाडी फाटा या दुसऱ्या टप्यासाठीही निधी मिळावा, अशी मागणी केली आहे. गडकरी यांनीही लवकरच त्याही कामासाठी निधी उपलब्ध करून देऊ असा शब्द लंके यांना दिला असल्याचेही तरटे यांनी यावेळी पत्रकार परीषदेत सांगीतले.

संपादन : अशोक मुरुमकर 

loading image