esakal | शरद पवार यांच्या सूचनेनुसार राष्ट्रवादीचे मंत्रीमंडळ लागले कामाला; ‘जनता दरबारा’त भेटणार बुधवारी मंत्री
sakal

बोलून बातमी शोधा

NCP cabinet started working as per Sharad Pawar suggestion

नागरिकांचे प्रश्‍न सोडवण्यासाठी शरद पवार यांनी राष्ट्रवादीचे सर्व मंत्रीमंडळ कामाला लावल्याचे चित्र आहे. बुधवारी (ता. २) सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत राष्ट्रवादीचे मंत्री कार्यकर्त्यांच्या भेटीसाठी प्रदेश कार्यालयात उपस्थित राहणार आहेत.

शरद पवार यांच्या सूचनेनुसार राष्ट्रवादीचे मंत्रीमंडळ लागले कामाला; ‘जनता दरबारा’त भेटणार बुधवारी मंत्री

sakal_logo
By
अशोक मुरुमकर

अहमदनगर : नागरिकांचे प्रश्‍न सोडवण्यासाठी शरद पवार यांनी राष्ट्रवादीचे सर्व मंत्रीमंडळ कामाला लावल्याचे चित्र आहे. बुधवारी (ता. २) सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत राष्ट्रवादीचे मंत्री कार्यकर्त्यांच्या भेटीसाठी प्रदेश कार्यालयात उपस्थित राहणार आहेत.

कोरोना व्हायरसला रोखण्यासाठी मार्चपासून राज्यात लॉकडाऊन सुरु आहे. जूनपासून यामध्ये शिथीलता आणण्यात आली. आता तर ई पासही बंद केले आहेत. गेल्या महिन्यात आंतरजिल्हा एसटी बस सुद्धा सुरु झाल्या आहेत. त्यामुळे नागरिकांना दिलासा मुळाला आहे. लॉकडाऊनमध्ये नागरिकांसह राजकीय नेते मंडळींना सुद्धा दौरे करण्यास अडचणी येत होत्या. त्यामुळे नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी नेत्यांना अडचणी येत होत्या. मात्र, आता लॉकडाऊनमध्ये शिथीलता आली असल्याने राजकीय पक्ष कामाला लागले आहेत. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या सूचनेनुसार राष्ट्रवादी दर बुधवारी ‘जनता दरबार’ घेणार आहे.

देशात कोरोना व्हायरसने धुमाकुळ घातला आहे. त्याला रोखण्यासाठी लॉकडाऊन करुनही दिवसांदिवस रुग्णांची संख्या वाढत आहे. संपूर्ण जग कोरोनापुढे हातबल झाल्याचे चित्र आहे. याचा अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम झाला आहे. त्यातून सावरण्यासाठी सरकार विविध उपाययोजना करत आहे. एकीककडे कोरोनाचे संकट तर दुसरीकडे अर्थव्यवस्थेवर होणारा परिणाम असे दुहेरी संकट निर्माण होण्याची चिन्हे आहेत. 

लॉकडाऊनमुळे राजकीय पक्षांनाही कामे करण्यावर मर्यादा येत होत्या. मात्र, लॉकडाऊनमध्ये शिथीलता आणल्याने राजकीय पक्ष देखील कामाला लागले आहेत. नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी ते पुढे येत आहेत. राष्ट्रवादीचे मंत्री शरद पवार यांच्या सूचनेनुसार मुंबईतील प्रदेश कार्यालयात कार्यकर्त्याच्या भेटी घेणार आहेत. प्रत्येक मंत्र्यांना वेगवेगळा वेळ ठरवून दिला आहे. त्या वेळेत हे मंत्री कार्यकर्त्यांना भेटणार आहेत. दर बुधवारी हा जनता दरबार होणार असल्याची माहिती राष्ट्रवादीच्या फेसबुक वॉलवरुन देण्यात आली आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार व आरोग्यमंत्री राजेश टोपे हे सकाळी १० ते दुपारी १२ या वेळेत कार्यकर्त्यांच्या भेटीसाठी उपस्थित असणार आहेत. याशिवाय सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे हे दुपारी २ ते ४ या वेळेत उपस्थित राहणार आहेत. राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे व मंत्री आदिती तटकर हे ४ ते ६ या वेळेत असणार आहेत.

loading image