esakal | प्रा. राम शिंदे बच्चा है, आगे आगे शिखो : एकनाथ खडसे 
sakal

बोलून बातमी शोधा

NCP Eknath Khadse criticizes BJP Ram Shinde

राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी भाजपचे उपाध्यक्ष माजी मंत्री प्रा. राम शिंदे यांच्यावर जोरदार टिका केली आहे.

प्रा. राम शिंदे बच्चा है, आगे आगे शिखो : एकनाथ खडसे 

sakal_logo
By
अशोक मुरुमकर

अहमदनगर : राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी भाजपचे उपाध्यक्ष माजी मंत्री प्रा. राम शिंदे यांच्यावर जोरदार टिका केली आहे. प्रा. शिंदे यांना भाजपात मीच प्रवेश दिला असून ‘ओ बच्चा है’ म्हणत त्यांना टोला लगावला आहे.

भाजपमध्ये चार वर्षापासून नाराज असलेल्या एकनाथ शिंदे यांनी काल शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला. तेव्हापासून त्यांच्या प्रवेशावर प्रतिक्रीया येत आहेत. त्यातच माजी मंत्री प्रा. शिंदे यांनी सिंचन गैरव्यहवारातील मुख्य साक्षीदार फोडण्याचा प्रयत्न केला असल्याचा गंभीर आरोप केला होता. त्याला ‘एबीपी’ माझाशी बोलताना राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी उत्तर दिले आहे. 

खडसे म्हणाले, ‘गाडी भरुन पुरावे ज्यावेळी नेले असे म्हटलं जातंय, पण तेव्हा तेवढे पुरावे नव्हते. औरंगाबादला पुरावे नेले तेव्हा मी उपस्थित ही नव्हतो. गाडीभर पुरावे म्हणतात पण ते एवढे पुरावे नव्हते. फक्त चार फाईल होत्या.

राम शिंदे हे प्राध्यापक आहेत. त्यांना भाजपात मी घेतले होते. त्यांच्या आमदाराकीच्या तिकीटासाठी मी प्रयत्न केले. त्यासाठी शिफारसही मी केली असल्याचे खडसे यांनी सांगितले. प्रा. शिंदे हे पक्षात नवीन असून ओ अभी बच्चा है, आगे आगे शिखो. त्यांना अजून खून शिकायचे आहे, असेही खडसे म्हणाले आहेत.

loading image