VIdeo : अजित पवारांविरोधात शेतकऱ्यांची नाराजी! नगरमध्ये अडवला ताफा

ncp leader ajit pawar convoy stopped ahamednagar akole Agasti Sugar Factory Election
ncp leader ajit pawar convoy stopped ahamednagar akole Agasti Sugar Factory Election

अकोले (जि. अहमदनगर) : राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांचा ताफा अडवल्याची घटना अहमदनगर जिल्ह्यात अकोले तालुक्यात घडली आहे. अजित पवार आज अकोले तालुक्यातील अगस्ती साखर कारखाना निवडणूक प्रचारासाठी आले. यावेळी शेतकऱ्यांनी त्यांचा ताफा अडवला. यावेळी अजित पवारांनी सीताराम गायकर यांचा प्रचार करू नये, अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात आली. (ncp leader ajit pawar convoy stopped ahamednagar akole Agasti Sugar Factory Election)

जिल्ह्यात सहकारी साखर कारखान्यांच्या निवडणुका नेहमीच गाजतात, अकोले तालुक्यातील अगस्ती सहकारी साखर कारखान्याची निवडणूक सध्या सुरू आहे. या निवडणुकीत माजी मंत्री मधुकर पिचड, त्यांचे पुत्र वैभव पिचड यांच्या विरोधात गायकर यांनी रणशिंग फुंकले आहे. अजित पवार आज अकोले तालुक्यात ऊस उत्पादकांच्या मेळाव्यात सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा प्रचार करणार आहेत. मात्र, ज्यांच्या प्रचारासाठी ते येत आहेत. त्या सीताराम गायकर यांच्यावर पवारांनी कधीकाळी जोरदार टीका केली होती.तर धोतर फेडण्याची भाषा वापरून आमदार लहामटे याना निवडून देण्याचे आव्हान केले होते त्यामुळे ज्यांनी मतदान केले तेच शेतकरी गाडीच्या पुढे आडवे येत आम्ही तुमचे ऐकले तुम्ही आमचे ऐका व परत जा असे आव्हान केले मात्र पोलिसांनी बळ वापरून आंदोलकांना बाजूला केले.

ncp leader ajit pawar convoy stopped ahamednagar akole Agasti Sugar Factory Election
मुंबईत शिवसैनिकांवरील हल्ल्यानंतर उद्धव ठाकरेंचा प्रतिक्रिया, म्हणाले...

२०१९ ला मधुकर पिचड आणि सिताराम गायकर यांच्याविरोधात अजित दादांनी अकोल्यात सभा घेतली होती. सिताराम गायकर यांचं धोतर फेडणार अशी वल्गना अजित दादांनी केली होती. पण पुन्हा राष्ट्रवादीत गेलेल्या सिताराम गायकर शेतकरी समृद्धी मंडळाच्या प्रचारासाठी अजित पवार आले. या गोष्टीचा जाब सभेच्या स्टेजवर जाऊन विचारणार असल्याचा निर्धार दशरथ सावंत यांनी दिला. या विरोधात पिचड समर्थक रस्त्यावर उतरले आणि त्यांनी अजित पवार यांचा ताफा अडवला.

ncp leader ajit pawar convoy stopped ahamednagar akole Agasti Sugar Factory Election
औरंगाबादच्या नामांतरावर शिक्कामोर्तब; उद्या होणार अधिकृत घोषणा

अजित पवारांचा कार्यक्रमात जाऊन त्यांना जाब विचारू अशी भूमिका दशरथ सावंत यांनी घेतल्याने आज सकाळी दशरथ सावंत व त्यांच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्या निषेधार्थ ताफा अडवल्यामुळे पोलिसांनी बळ वापरले. यावेळी शेतकऱ्यांनी सावंत यांना ताब्यात घेतल्याचाही निषेध केला आहे. ताफा अडवणारे शेतकरी पूर्वी आमदार लहामटे यांच्यासोबत असणारे व अलीकडे मधुकर पिचड समर्थक असल्याची प्राथमिक माहिती आहे. अजित पवार यांना व्यासपीठावर जाऊन थेट सवाल करण्याचा इशारा दशरथ सावंत यांनी दिला होता, त्यामुळे पोलीसांनी सभेपूर्वीच सावंत यांना ताब्यात घेतले. याबाबत निषेध सभा शेतकऱ्यांनी अकोले बसस्थानकासमोर घेतली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com