esakal | विषय महाराष्ट्राचा प्रतिक्रिया हिंदीत?; राष्ट्रवादीचे नेते संतापले
sakal

बोलून बातमी शोधा

NCP leader Jayant Patil question Devendra Fadnavis

राज्यात सध्या सुशांतसिंह राजपूत आत्महत्या व कंगणा राणावत प्रकरण मोठ्याप्रमाणात चर्चेत आहे.

विषय महाराष्ट्राचा प्रतिक्रिया हिंदीत?; राष्ट्रवादीचे नेते संतापले

sakal_logo
By
अशोक मुरुमकर

अहमदनगर : राज्यात सध्या सुशांतसिंह राजपूत आत्महत्या व कंगणा राणावत प्रकरण मोठ्याप्रमाणात चर्चेत आहे. याकडे इतर राज्यांचेही लक्ष लागलेले आहे. यात दररोज नवनवीन घडामोडी घडत आहेत. यामुळे राजकारणही तापले आहे.

भाजपकडून महाविकास आघाडी सरकारवर वेगवेगळे आरोप केले जात आहेत. तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सरकारमधील मंत्री व कँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेनेचे नेतेही जोरदार प्रतीउत्तर देत आहेत. अशातच जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी ‘विषय महाराष्ट्राचा, प्रतिक्रिया हिंदीत?’ असं ट्विट करुन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना प्रश्‍न केला आहे.

अभिनेत्री कंगना राणावत यांच्या अनाधिकृत बांधकामावर कारवाई झाल्यानंतर भाजपचे देवेंद्र फडणवीस यांनी एक व्हिडीओ केला होता. ९ सप्टेंबरला फडणवीस यांनी केलेल्या व्हिडीओमध्ये सरकारवर टिका केली होती. एखादी चुक असेल तर त्याला चुकच म्हटलं पाहिजे. पण त्यातून जी कारवाई केली जात आहे. त्यातून महाराष्ट्राचा अपमान होत आहे.

एखाद्याने आपल्या विरुद्ध वक्तव्य केले तर त्यावर अशी कारवाई करणे चुकीचे असल्याचे म्हटलं होते. हा संपूर्ण व्हिडीओ हिंदीत असल्यामुळे राष्ट्रवादीचे नेते मंत्री जयंत पाटील संतापले आहेत. मंत्री पाटील यांनी याबाबत ट्विट केले आहे. त्यांनी त्यात म्हटलं आहे की, ‘विषय महाराष्ट्राचा प्रतिक्रिया हिंदीत? महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते बोलत आहेत की भाजपचे बिहार निवडणुक प्रभारी हे महाराष्ट्रातील जनतेला कळायला हवं?’ 

बिहारमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणूकीत भाजपचे निवडणुक प्रभार म्हणून फडणवीस यांची नियुक्ती झालेली आहे. त्यामुळे तेथील नागरिकांना समजावे म्हणून तर ते हिंदीत बोलत नाहीत ना असा प्रश्‍न केला जात आहे. महाराष्ट्रात मराठीत प्रतिक्रीया न देता हिंदीत व्हिडीओ करुन प्रतिक्रिया दिल्याने विरोधीपक्ष नेते फडणवीस यांच्याबाबत संताप व्यक्त केला जात आहे.