श्रीगोंद्यात राष्ट्रवादी भूकंपाच्या तयारीत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

NCP

श्रीगोंद्यात राष्ट्रवादी भूकंपाच्या तयारीत

श्रीगोंदे : तालुक्यात सगळ्याच पक्षात मैत्रीचे संबंध असणारे पण वरकरणी काँग्रेस अथवा भाजप यांच्याशी एकनिष्ठ असल्याचे भासविणाऱ्या काही नेत्यांना राष्ट्रवादीत आणण्याची जोरदार तयारी सुरू आहे. त्यासाठी राहुल जगताप आणि नाहाटा पॅटर्न राबवित आहेत. काहींचे तळ्यात-मळ्यात असले तरी अधांतरी असणारे अनेक नेते लवकरच हातात घड्याळ बांधणार असल्याची माहिती आहे.

राष्ट्रवादीचे माजी आमदार राहूल जगताप यांनी राष्ट्रवादीची संघटनात्मक बांधणी करुन पक्षाला बळकटी देणार असल्याचे व तालुक्यातील यापुढील निवडणुका राष्ट्रवादी काँग्रेस स्वबळावरच लढविणार असल्याचे यापूर्वीच अनेकदा ठणकावून सांगितले. तथापि त्यांना ही जुळवणी करण्यासाठी सारथी मिळत नव्हता. आता तो बाळासाहेब नाहाटा यांच्या रूपाने मिळाला आहे. त्यामुळे आता पक्ष वाढीसाठी प्रयत्न

राष्ट्रवादीत ''इनकमिंग''चे संकेत

या महिन्याच्या अखेरीला बाळासाहेब नाहाटा यांचा राष्ट्रवादीत प्रवेश होत. श्रीगोंद्यातील या कार्यक्रमासाठी पक्षाची पहिली फळी येईल. त्यातच माजी जिल्हा परिषद सदस्य अण्णासाहेब शेलार यांचा प्रवेश निश्चित आहे. या दोघांव्यतिरिक्त अर्धा डझन नेत्यांच्या प्रवेशाची चर्चा आहे. मात्र, त्याला दुजोरा मिळत नाही. जगताप व नाहाटा टीमकडून डावपेच आखले जात आहेत. या डावपेचांनुसार तालुक्यातील काँग्रेस-भाजपाला खिंडार पाडून ''जोर का झटका'' देण्याचा दावा केला जात आहे.

नाहाटा यांचा अधिकृत प्रवेश होणार असून अण्णासाहेब शेलार हेही आमच्यासोबत येत आहेत. इतरांविषयी सस्पेन्स आहे.

-राहुल जगताप, माजी आमदार

सध्या वेट अँड वॉचची भूमिका आहे. आपण राजकारणापासून बाजूला आहोत. पुढच्या राजकारणासाठी सगळे पर्याय खुले आहेत.

- लक्ष्मण नलगे, भाजप नेते

Web Title: Ncp Prepares Earthquake Shrigonda

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :AhmednagarNCPSakalncp mla
go to top