esakal | शरद पवार, नितीन गडकरी उद्या एकाच मंचावर
sakal

बोलून बातमी शोधा

शरद पवार, नितीन गडकरी उद्या एकाच मंचावर

शरद पवार, नितीन गडकरी उद्या एकाच मंचावर

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नगर तालुका : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार व केंद्रीय रस्ते वाहतूक व परिवहनमंत्री नितीन गडकरी शनिवारी (दोन ऑक्टोबर) रस्ताकामाचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळ्यासाठी नगरला येत आहेत. केडगावजवळील सोनेवाडी रस्त्यावर होणाऱ्या कार्यक्रमात ते एकाच व्यासपीठावर असतील. गडकरी यांच्या पुढाकाराने रस्त्यांची कामे होत आहेत, अशी माहिती भाजपचे नगर शहर जिल्हाध्यक्ष महेंद्र तथा भय्या गंधे यांनी दिली.

यावेळी सुनील रामदासी, सचिन पारखी उपस्थित होते. नगर जिल्ह्यात पवार व गडकरी या दोन मातब्बर नेत्यांसह शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी व कॉँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते पहिल्यांदाच एका मंचावर येत आहेत. नगर-करमाळा-टेंभुर्णी या चौपदरी रस्त्यासाठी मोठा निधी, सावळीविहीर ते अहमदनगर रस्त्याच्या रुंदीकरणासाठी ४९६ कोटी, अहमदनगर- भिंगार या १८ किलोमीटर रस्तारुंदीकरणासाठी ३५ कोटी रुपये, तर राष्ट्रीय राखीव निधीमधील कामांसाठी ८४ कोटी रुपये खर्च होत आहे.

या कामांचे भूमिपूजन होणार आहे. अहमदनगर-दौड-वासुंदे फाटा रस्ता मजबुतीकरण, अहमदनगर-कडा-आष्टी-जामखेड रस्ता मजबुतीकरण, नांदूर शिंगोटे ते कोल्हार रस्ता मजबुतीकरण व कोपरगाव-वैजापूर रस्ता मजबुतीकरणाची कामे पूर्ण झाली असून, त्यांचा लोकार्पण सोहळा होणार आहे. केडगावजवळील सोनेवाडी रस्त्यावरील श्रेया गार्डन येथे मुख्य कार्यक्रम होत आहे.

loading image
go to top