Ahilyanagar News: 'कोकाटेंच्या राजीनाम्यासाठी राष्ट्रवादीची निदर्शने'; जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या देऊन घोषणा
महाराष्ट्र राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी यापूर्वी अनेकवेळा वादग्रस्त विधाने केली आहेत. शेतकऱ्यांबद्दल अर्वाच्च भाषेत उद्गार काढून त्यांचा अपमानदेखील केला आहे. पंचनामा करण्यासाठी अधिकाऱ्यांना आदेश देतानाची अरेरावी, कर्जमाफीवरील वक्तव्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात त्यांच्या विरोधात संतापाची लाट आहे.
अहिल्यानगर: कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा घेण्याच्या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) च्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून ठिय्या देण्यात आला. यावेळी आंदोलकांनी कृषिमंत्री हटावच्या जोरदार घोषणा दिल्या.