esakal | खूशखबर! श्रीगोंदा-जामखेड राष्ट्रीय महामार्गाचाही प्रश्न मार्गी; निघाली कामाची ई-निविदा
sakal

बोलून बातमी शोधा

NCP's young leader MLA Rohit Pawar has once again become powerful as the e-tender for Shrigonda-Jamkhed National Highway has just been announced.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या कायम संपर्कात राहून पाठपुरावा केल्याने आ.रोहित पवार यांनी घेतलेल्या परिश्रमाचे मतदारसंघाला फलित मिळाले आहे.

खूशखबर! श्रीगोंदा-जामखेड राष्ट्रीय महामार्गाचाही प्रश्न मार्गी; निघाली कामाची ई-निविदा

sakal_logo
By
वसंत सानप

जामखेड (अहमदनगर) : जिल्ह्याच्या दृष्टीने महत्वाचा असलेल्या न्हावरा-इनामगाव-काष्टी-श्रीगोंदा-जळगाव-जामखेड (राज्यमार्ग-५५) या राज्यमार्गाला आता राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा प्राप्त झाला आहे. आता हा राज्यमार्ग राष्ट्रीय महामार्ग ५४८ (ड) म्हणून नव्याने मंजूर झाला आहे. (सेक्शन-२) आढळगाव ते जामखेड या ६२.७७५ कि.मी. दुपदरी महामार्गाच्या कामाची ई-निविदा नुकतीच जाहीर झाली असल्याने राष्ट्रवादीचे युवा नेते, आ.रोहित पवार पुन्हा एकदा 'पॉवरफुल' ठरले आहेत.
 
अहमदनगरच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा 

पंधरा दिवसांपूर्वीच नगर-सोलापूर ५१६ (अ) या नवीन चौपदरी राष्ट्रीय महामार्गाच्या कामात असणारे अडथळे दूर करून या महामार्गाला मंजुरी मिळवली होती आता त्या कामाची ई-निविदा निघाली आहे. १५ दिवसांतच दोन्हीही राष्ट्रीय महामार्गाच्या कामांची निविदा निघाल्याने मतदारसंघासाठीच नव्हे तर अनेक तालुक्या-जिल्ह्यांसाठी हे महामार्ग विकासाची नवी दिशा देणारे ठरणार आहेत. या नवीन महामार्गांमुळे दळणवळणाची सुविधा वाढण्यास मदत होणार आहे.

हे ही वाचा : देशातील 25 खासदारांत लोखंडे ; कोविड काळात मदत करणाऱ्या लोकप्रतिनिधींची यादी जाहीर

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या कायम संपर्कात राहून पाठपुरावा केल्याने आ.रोहित पवार यांनी घेतलेल्या परिश्रमाचे मतदारसंघाला फलित मिळाले आहे. राज्यमार्ग (क्र.५५) चे राष्ट्रीय महामार्गात रूपांतर होऊन आता या मार्गाचा राष्ट्रीय महामार्ग क्र.५४८ (ड) असा सामावेश झाला असून नव्याने होणारा हा मार्ग १८ महिन्यांच्या कालावधीत पूर्ण होणार आहे. रस्ता झाल्यापासून १० वर्षे त्याच्या डागडुजीचा कालावधी निश्चित करण्यात आला आहे. पुढील काळात या महामार्गांमुळे मोठा कायापालट होईल, असा विश्वास आ. रोहित पवार यांनी व्यक्त केला. या मार्गासाठी खा.सुजय विखे यांचेही प्रयत्न सुरू होते.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

राष्ट्रीय महामार्गांचे उजळले भाग्य !

आ.रोहित पवार हे कर्जत-जामखेड मतदारसंघाचे आमदार म्हणून निवडून आले. मात्र आमदार म्हणून त्यांचे कार्य मतदारसंघापुरते सिमीत राहिले नाही. राज्य पातळीवरचे अनेक प्रश्न वर्षात मार्गी लावण्यात त्यांना यश आले आहे. सर्वात महत्वाच्या असलेल्या राष्ट्रीय महामार्गांचे भाग्यही त्यांच्यामुळे उजळले आहे.

loading image