शेतशिवारात उडताहेत तुषार सिंचनाचे फवारे; नेवाशात दोन वर्षात साडेचार हजार लाभार्थी

सुनील गर्जे 
Thursday, 7 January 2021

नेवासे तालुक्यात तुषार व ठिबक योजनेचा २०१८-१९ मध्ये १ हजार २०३ लाभार्थी असून यातून ८२० हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आले तर २०१९-२० मध्ये याच योजनेचे ३ हजार २२४ लाभार्थी असून यातून एकूण २ हजार २२० हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येत आहे.

नेवासे (अहमदनगर) : पारंपरिक शेतीला फाटा देत तालुक्यातील शेतक-्यांनी आधुनिकतेची कास धरली आहे. त्यात अनेक शेतकऱ्यांनी तुषार व ठिबक सिंचनाद्वारे पिकांना पाणी देण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे पाण्याची बचत होऊन उत्पादन वाढीस मदत होताना दिसत आहे. तालुक्यात २०१८- २० या दोनवर्षात ४ हजार ४२८ शेतकऱ्यांनी तुषार व ठिबक सिंचन योजनेचा लाभ घेतला घेतला आहे.

अहमदनगरच्या बातम्यांसाठी येथे क्लिक करा  

नेवासे तालुक्यात तुषार व ठिबक योजनेचा २०१८-१९ मध्ये १ हजार २०३ लाभार्थी असून यातून ८२० हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आले तर २०१९-२० मध्ये याच योजनेचे ३ हजार २२४ लाभार्थी असून यातून एकूण २ हजार २२० हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येत आहे. तालुक्यासह सर्वत्रच यंदा चांगला पाऊस  झाल्याने जलस्त्रोतांची पाणी पातळी वाढली आहे. त्यामुळे बागायती क्षेत्रात वाढ झाली आहे. अनेक शेतक-्यांनी ऊस, भाजीपाला लागवडीबरोबरच इतर बागायती क्षेत्रात वाढ केली आहे. सध्या गहू, हरभरा, रबी ज्वारीसह ऊस आदी पिकांसह फळबागा जोमात आहेत. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

या पिकांना पाणी देण्यासाठी शेतकरी तुषार, ठिबक सिंचन पद्धतीचा वापर करत आहेत. विहिरी, बोअर, तलाव, धरणात मुबलक पाणी असल्याने व पाणीवरच असल्याने तुषार संचाला चांगला दाब मिळत आहे. त्यामुळे तालुक्यातील शेतशिवारात तुषारचे 'फवारे उडताना दिसत आहेत. तुषार सिंचन पद्धतीत पाण्याचा अपव्यय न होता पाण्याची बचत होते. शेत समपातळीत नसेल तरी पूर्ण पिकालापाणी देणे सुलभ होते.

शिवाय पिकावरील मावा व इतर रोग या तुषारच्या फवाऱ्याने कमी होण्यास मदत होते. त्यामुळे नेवासे तालुक्यातील अनेक शेतकरी गहू, हरभरा व रबी ज्वारीला तुषारने पाणी देत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
 
नेवासे सूक्ष्म सिंचन दृष्टीक्षेपात

* वर्ष            लाभार्थी        ओलित क्षेत्र
* २०१८-१९     १२०३           ८२० हेक्टर
* २०१९-२०     ३२२४           २२२० हेक्टर.

शेतकऱ्यांना तुषार व ठिबकचा वापर करणे नेहमीच हितावह आहे. तुषारमुळे ४०-४५ टक्के तर ठिबकमुळे ६०-६५ टक्के पाण्याची बचत होण्याबरोबरच पिकाला जेवढे पाणी आवश्यक आहे, तेवढेच आपण देऊ शकतो. अधिकाधिक शेतकऱ्यांनी ठिबक, तुषार सिंचनाचा अवलंब करणे गरजेचे आहे.
-दत्तात्रेय डमाळे, तालुका कृषी अधिकारी, नेवासे
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In nevasa many farmers have started irrigating their crops through sprinkler and drip irrigation