esakal | संशयित सापडल्यानेही नेवासकरांच्या पोटात भीतीचा गोळा

बोलून बातमी शोधा

Nevasekar suffers from corona disease

तब्बल पंचवीस दिवसांनंतर कोरोना संशयीत सापडल्याने तालुका प्रशासनाची धावपाळ उडाली अाहे. 

संशयित सापडल्यानेही नेवासकरांच्या पोटात भीतीचा गोळा
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नगर : श्वसनाचा व घशात त्रास झाल्याने कोरोना संशयीत म्हणून माळीचिंचोरे (ता. नेवासे) येथील विलगिकरण कक्षातील एका पस्तीस वर्षीय व्यक्तीला तर खबरदारी म्हणून त्याच्या पत्नीसह मुलाला आज गुरुवारी तपासणीसाठी नेवासे फाटा येथील वसतिगृहाच्या विलगिकरण कक्षात दाखल करणे आहे, अशी माहिती 
तहसीलदार रुपेशकुमार सुराणा यांनी दिली.

तब्बल पंचवीस दिवसांनंतर कोरोना संशयीत सापडल्याने तालुका प्रशासनाची धावपाळ उडाली अाहे. एक महिन्याच्या विश्रांतीनंतर पुन्हा प्रशासन कामाला लागले आहे. नाशिक येथे खाजगी कंपनीत नोकरीला असणारी एक पस्तीस वर्षीय व्यक्ती नाशिक येथील त्यांच्या कॉलनीतील मावस भावसह पाच व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह निघाल्या. गेल्या आठ दिवसांपूर्वी आपल्या पत्नी, मुलासह आपल्या माळीचिंचोरे गावी आली. येथे आल्यावर त्यांना जिल्हा परिषदेच्या शाळेत असलेल्या विलगिकरण कक्षात ठेवले. 

हेही वाचा - पारनेरला मुंबईतून कोरोनाचे इनकमिंग

आज गुरुवार (ता,२५) या व्यक्तीच्या घशात व श्वासनास त्रास होत असल्याचे स्थानिक कमिटीने सांगितले. सरपंच सुरेख धानापुणे यांनी ही माहिती तहसीलदार रुपेशकुमार सुराणा व आरोग्य विभागाला कळवली. माहिती मिळताच तहसीलदार सुराणा हे आरोग्य कर्मचाऱ्यांसह तातडीने माळीचिंचोरे येथे आले. उपस्थित आरोग्य अधिकाऱ्याने त्या व्यक्तीची तपासणी केली. 

तहसीलदार सुराणा यांनी त्या व्यक्तीसह त्याचा मुलगा व पत्नी यांना  घशाच्या स्राव नमुने तापासणीसाठी नेवासे फाटा येथील विलीगिकरण कक्षात दाखल केले आहे. यावेळी स्थानिक कमिटीचे कामगार तलाठी श्रीकांत भाबड, ग्रामविकास अधिकारी एस. आर. बोरुडे, नीलेश मोटे, एकनाथ धानापुणे उपस्थित होते.

"संशयीत व्यक्तीसह खबरदारी म्हणून त्याचा मुलगा, पत्नी यांना तापासणीसाठी दाखल केले आहे. आज त्यांचे स्राव नमुने तापासणीसाठी पाठविले. दोन दिवसांपूर्वी नाशिक येथे या व्यक्तीबरोबरच्या कोरोना पॉझिटिव्ह  मावस भावाचा मृत्यू झाला असल्याने ही  व्यक्ती घाबरलेली आहे. तसेच या व्यक्तीला रक्तदाबाचाही त्रास आहे. कोरोनाबाबत अहवाल आल्यावर स्पष्ट होईल. 
-रुपेशकुमार सुराणा, तहसीलदार, नेवासे