esakal | दुकाने, मॉल आणि आठवडे बाजाराबाबत नवा आदेश
sakal

बोलून बातमी शोधा

New order of district administration regarding shops

अहमदनगर जिल्हा महसुल स्थळ सीमेच्या हद्दीतील कंटेंटमेंट झोन वगळता महानगरपालिका, नगरपालिका
हदीतीन एकल (stand alone), वसाहतीलगत असणारी, निवासी संकुलामधील सर्व दुकाने सुरु राहतील.

दुकाने, मॉल आणि आठवडे बाजाराबाबत नवा आदेश

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नगर ः लॉकडाउनच्या काळात जिल्हा प्रशासनाने वेळोवेळी आदेश काढले आहेत. दुकानांबाबतच्या वेगवेगळ्या आदेशांमुळे ते संभ्रमात आहेत. काहींना आदेशातील भाषाच कळत नसल्याने गोंधळ उडत आहेत. जर दुकान उघडले तर आणि कारवाई झाली तर काय करायचे, असा प्रश्न या दुकानदारांपुढे उभा राहतो. दुकान उघडले नाही तर खायचे वांदे झाल्याने इकडे आड तिकडे विहीर अशी अवस्था झाली आहे.

अहमदनगर जिल्हा महसुल स्थळ सीमेच्या हद्दीतील कंटेंटमेंट झोन वगळता महानगरपालिका, नगरपालिका
हदीतीन एकल (stand alone), वसाहतीलगत असणारी, निवासी संकुलामधील सर्व दुकाने सुरु राहतील. तथापि याची काटेकोर अंमलबजावणी आणि नियोजन करण्याची जबाबदारी संबंधित स्थानिक प्राधिकरण यांची राहील, असे आदेश जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी जारी केले आहेत.

हेही वाचा - कर्जत-जामखेडमध्ये रोहित पवारांचा मार्ग निर्धोक

यापूर्वी जिल्हा प्रशासनाने नागरी भागात एखाद्या गल्लीत / रस्त्यालगत पाच पेक्षा अधिक दुकाने असल्यास अशा दुकानांपैकी फक्त जीवनावश्यक वस्तूची विक्री करणारीच दुकाने सुरु राहतील, असे आदेश जारी केले होते. त्या आदेशात आता सुधारणा करण्यात आली आहे. अर्थात, नागरी क्षेत्रातील सर्व मॉल्स आणि आठवडी बाजार हे पूर्णतः बंद राहतील. नागरी क्षेत्रातील बाजारपेठ व व्यापारी संकुलातील फक्त जीवनावश्यक वस्तू विक्रीची दुकाने सुर राहतील.

सर्व दुकानांच्या ठिकाणी मास्क व सॅनिटायझर्स वापरणे अनिवार्य आहे. सर्व दुकानांचे ठिकाणी सामाजिक अंतर (Social dislancing) पालन होईल, याबाबत त्याठिकाणांचे प्रभारी अधिकारी यांनी दक्षता घ्यावी. सर्व दुकनांचे ठिकाणी अनावश्यक गर्दी टाळावी, सार्वजनिक ठिकाणी व दकानांचे ठिकाणी मास्क न वापरणारे व थुंकणाऱ्या व्यक्तीविरुद्ध संबंधित प्राधिकरणाने दंडात्मक कारवाई करावी.

संबंधित स्थानिक प्राधिकरणाने सर्थ दुकानामध्ये समाजिक अंतर (Social distance) पालन होत नसल्यास, दुकानासमोर अनावश्यक गर्दी दिसून आल्यास सदर दुकान सील करावे. तसेच सदर आस्थापना प्रमुखावर फौजदारी स्वरुपाचा गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही करावी, असे आदेशात स्पष्ट केले आहे.

कोणतीही व्यक्ती/ संस्था/ संघटना यांनी या आदेशाचे उल्लंघन केल्यास भारतीय दंड विधान संहिता (45 ऑफ 1860) च्या कलम 188 नुसार दंडनीय / कायदेशीर कारवाईस व आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 मथील तरतुदीनुसार
कारवाईस पात्र राहतील, असे आदेशात नमूद केले आहे.