नगर उड्डाणपुलाला नवा मुहूर्त! 

विनायक लांडे 
शुक्रवार, 10 जुलै 2020

नगरमधील बहुचर्चित उड्डाणपुलाच्या कामास अखेर गती मिळणार आहे. संरक्षण मंत्रालयाकडून याबाबतीत ना हरकत प्रमाणपत्र प्राप्त झाले. त्यामुळे उड्डाणपुलाच्या कामासाठी आता फक्त भारतीय राष्ट्रीय राजमार्ग विकास प्रधिकारणाकडे वर्क ऑर्डर काढण्याची औपचारिकता पूर्ण करण्याची आवश्‍यकता आहे. पुढील महिन्यात कामास प्रत्यक्ष सुरवात होईल,'' असा विश्‍वास खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी व्यक्त केला

नगर ः ""नगरमधील बहुचर्चित उड्डाणपुलाच्या कामास अखेर गती मिळणार आहे. संरक्षण मंत्रालयाकडून याबाबतीत ना हरकत प्रमाणपत्र प्राप्त झाले. त्यामुळे उड्डाणपुलाच्या कामासाठी आता फक्त भारतीय राष्ट्रीय राजमार्ग विकास प्रधिकारणाकडे वर्क ऑर्डर काढण्याची औपचारिकता पूर्ण करण्याची आवश्‍यकता आहे. पुढील महिन्यात कामास प्रत्यक्ष सुरवात होईल,'' असा विश्‍वास खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी व्यक्त केला. 

ही वाचा - पारनेरच्या नगरसेवकांच्या तिढ्याबाबत पालकमंत्री मुश्रीफ म्हणतात..

डॉ. विखे पाटील म्हणाले, ""उड्डाणपुलाच्या कामासाठी संरक्षण मंत्रालयाच्या एनओसीची गरज होती. संरक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत हा प्रश्‍न येत होता. फक्त नगरच्या उड्डाणपुलाला सोयीचे व्हावे, म्हणून देशाचे धोरण अनुकूल करण्यात आले. त्यासाठी संरक्षणमंत्री राजनाथसिंह आणि रस्ते व महामार्ग विकासमंत्री नितीन गडकरी यांनी संरक्षण दलाच्या सर्व अधिकाऱ्यांसमवेत घेतलेल्या बैठकीची ही फलनिष्पत्ती आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नगरमधील उड्डाणपुलासाठी सकारात्मक निर्णय घेतला. त्यामुळे नगर-औरंगाबाद व नगर-पुणे या मार्गांवरचे दळणवळण वाढून नगरच्या विकासात हातभार लागणार आहे.'' 

शहरात 1999पासून नगरकरांना विविध राजकीय पुढाऱ्यांकडून शहरातील उड्डाणपुलाचे स्वप्न दाखविण्यात आले. तीन ते चार वेळेला या उड्डाणपुलासाठी भूमिपूजनही करण्यात आले. मात्र प्रत्यक्षात काम सुरू झालेले नाही. आठवड्याभरात उड्डाणपुलाचे काम सुरू होणार अशी आश्‍वासने यापूर्वी आमदार व खासदारांनी अनेक वेळा दिली आहेत. त्यामुळे उड्डाणपुलाचे काम सुरू होईल त्याचे वेळी खरे असे नगरकर मानू लागले आहेत. नगर उड्डाणपुलाचा पहिल्यांदा आराखडा तयार झाल्यानंतर नाशिक शहरात सात उड्डाणपुलांचा आराखडा तयार होऊन कामही पूर्ण झाले आहे. 

शहरातील उड्डाणपूल सुरवातीला सक्‍कर चौक ते जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालय चौक दरम्यान होणार होता. नंतर त्याचे अंतर दोन वेळा कमी करण्यात आले. उड्डाणपुलाचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाकडून होणार होते. ते काम सुरू न झाल्याने हे काम भारतीय राष्ट्रीय राजमार्ग विकास प्रधिकारणाकडे  वर्ग करण्यात आले आहे. 

संपादन; अमित आवारी


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: New time for city flyover!