esakal | शिर्डी विमानतळाच्या शेजारी नवे शहर
sakal

बोलून बातमी शोधा

uddhav thackeray

शिर्डी विमानतळाच्या शेजारी नवे शहर

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : विमानतळाच्या सभोवतालचा परिसर विकसित करून सर्व सुविधायुक्त शहर वसविण्यासाठी शिर्डीची निवड करण्यात यावी, तसेच महाराष्ट्रातील एक उत्तम विकास केंद्र या ठिकाणी वसवावे, अशी सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली.

महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीच्या संचालक मंडळाच्या बैठकीत ते बोलत होते. ‘वर्षा’ येथील समिती कक्षात झालेली ही ७६वी बैठक होती. ‘एरिया अराउंड शिर्डी हब एअरपोर्ट’ म्हणजेच ‘आशा’ असे या भागाचे नाव असेल. या भागाचा महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी नावीन्यपूर्ण आणि सुनियोजित विकास करणार आहे.

अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी हे देशातील एक प्रसिद्ध धार्मिक पर्यटनस्थळ आहे. दर वर्षी येथे देश-विदेशातून लाखो पर्यटक भेट देत असतात. शिर्डी विमानतळ व सभोवतालच्या परिसराचा विकास झाल्यास तेथे विविध प्रकल्पांची गुंतवणूक आकर्षित होईल आणि हे राज्यातील उत्तम विकास केंद्र बनेल. रोजगार निर्मिती होईल व विमानतळ परिसरात पायाभूत सुविधा निर्माण झाल्याने पर्यटन व्यवसाय आणखी वृद्धिंगत होईल.

विमानतळाचा विकास व्हावा

केवळ विकासाच्या नावाखाली विमानतळ सुरू करून त्याचा विकास करण्यात येऊ नये, तर जेथे औद्योगिक विकास होऊ शकेल, पर्यटनाला चालना मिळेल, रोजगाराच्या संधी निर्माण होतील, अशा भागात विमानतळाची उभारणी आणि त्याचा विकास करावा, असे निर्देशही मुख्यमंत्री ठाकरे यांनी दिले.

loading image
go to top