
जामखेडकरांसाठी जिव्हाळ्याचा प्रश्न ठरणारी 107 कोटी रुपये खर्चाची नळपाणीपुरवठा योजना लवकरच सुरू होईल,' असे प्रतिपादन आमदार रोहित पवार यांनी केले.
जामखेड : "जामखेड नगरपालिकेच्या सर्व प्रकार प्रभागांसाठी साडेसात कोटींची विकास कामे मंजूर केली असून सदरच्या कामाच्या निविदा निघालेल्या आहेत. थोड्याच दिवसांत सदरच्या कामांना सुरुवात होणार आहे.
जामखेडकरांसाठी जिव्हाळ्याचा प्रश्न ठरणारी 107 कोटी रुपये खर्चाची नळपाणीपुरवठा योजना लवकरच सुरू होईल,' असे प्रतिपादन आमदार रोहित पवार यांनी केले.
आमदार रोहित पवार यांनी शनिवारी (ता. 19) जामखेड नगरपालिकेच्या कार्यक्षेत्रातील
नऊ प्रभागाचा दौरा करून नागरिकांशी संवाद साधला. यावेळी नगराध्यक्ष निखिल घायतडक, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस राजेंद्र कोठारी, कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघप्रमुख प्रा. मधुकर राळेभात, तालुकाध्यक्ष दत्तात्रय वारे, युवक नेते सुर्यकांत मोरे, अमित जाधव, महेश निमोणकर, मोहन पवार, दिगंबर चव्हाण, मोहन पवार, लक्ष्मण ढेपे आदी उपस्थित होते.
हेही वाचा - श्रीरामपूर तालुक्यात दीड हजार जणांना मिळणार कोरोना लस
आमदार रोहित पवार यांनी विकासकामांचा लेखा-जोखा नागरिकांसमोर मांडला. नगरपालिकेच्या कार्यक्षेत्र मंजूर केलेली विविध विकास कामे सांगितले.
पवार म्हणाले, की "शहरातील विजेच्या संदर्भात निर्माण होणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी नव्याने सहा कोटी रुपये खर्चाची योजना हाती घेण्यात येणार असून घरासमोरून गेलेल्या तारा ह्या अधिक उंचावर तर काही ठिकाणी अंडर ग्राऊंड करण्यासाठीचा प्रकल्प हाती घेण्यात येणार आहे. प्रभागनिहाय रस्ते गटार आदींसह विविध विकास कामे मार्गी लावण्याची ग्वाही त्यांनी दिली.
दरम्यान, जनतेशी संवाद साधण्यापूर्वी आमदार रोहित पवार यांनी नगरपालिकेचे मुख्याधिकारी नगरसेवक व नागरिक यांची संयुक्त बैठक घेऊन शहरातील विकासकामांची परिस्थिती जाणून घेतली. मोकाट जनावरांच्या बंदोबस्त करण्याच्या सूचनाही त्यांनी संबंधितांना दिल्या.
संपादन - अशोक निंबाळकर