
-मोहन गायकवाड
नेवासे शहर : नेवासे तालुका हा संताची भूमी म्हणून ओळखला जाणार तालुका आहे. याच ठिकाणी संत ज्ञानेश्वर महाराज यांनी पैस खाबांला टेकून ज्ञानेश्वरी सारख्या महान ग्रंथाची निर्मिती केली. सूक्ष्मजीवांसह पशुपक्षी, झाडे, पाने, फुले व जीवमात्रांसाठी पसायदान नावाची वैश्विक प्रार्थना याठिकाणी ज्ञानेश्वरांनी लिहिली. हेच पसायदान नित्यनियमाने सर्वाच्या ओठी यावे, म्हणून शहरातील दत्तात्रय शिंदे यांनी पसायदानाची तब्बल ९९९९ वर्ष चालणारी एक दिनदर्शिका बनवली आहे.