नेवासे : शेतकऱ्यांच्या धनादेशात मोठा गफला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

farmer

नेवासे : शेतकऱ्यांच्या धनादेशात मोठा गफला

नेवासे : महाराष्ट्र शासनाकडून शेतक-यांना देण्यासाठी आलेल्या नैसर्गिक आपत्तीचे धनादेश बनावट सही व शिक्का वापरून देडगाव (ता.नेवासे) येथील एका कोतवालाने सोळा लाख १४ हजार ७८४ रुपयांचा अपहार केला आहे. ही गंभीर घटना उघडकीस आल्यानंतर शेतकऱ्यांतून संताप व्यक्त होत आहे.

नेवाशाचे तहसीलदार रुपेशकुमार सुराणा यांनी याबाबत आज (रविवारी) रात्री नेवासे पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. शेतकऱ्यांच्या नावे असलेले धनादेश नाव बदलून व त्यावर अधिक रक्कम टाकून तहसीलदार नावाचा बनावट शिक्का मारण्यात आला. धनादेशावर खोटी सही करुन ३ फेब्रुवारी २०१४ ते २७ ऑगस्ट २०२० तसेच १५ सप्टेंबर २०२१ ते आजपर्यंत हा अपहार झाल्याच्या फिर्यादीवरून कोतवाल अविनाशपान हिवाळेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नैसर्गिक आपत्ती व टंचाई संकलन विभागातील महसूल सहायक राजेंद्र दगडू वाघमारे, तुकाराम एल तांबे, मनोहर ए डोळस व अव्वल कारकून धीरज साळवे तालुक्यातील सर्व कामगार तलाठ्यांकडून आलेले पंचनामा यादी शासनास पाठवून मंजूर धनादेश पुन्हा तलाठी व कोतवालांकडे देत होते. आरोपी हिवाळे याने वेगवेगळे नावे धनादेशवर टाकून हा अपहार केला आहे.

पदाचा गैरवापर करुन शेतक-यांना धनादेश न देता ते धनादेश कुकाणे, देडगाव, भेंडे, शेवगाव, सावेडी, नगर येथील वेगवेगळ्या बॅंकेत वेगळ्या नाव टाकून रक्कम हडप केली. सन २०१४ पासून सुरू असलेला हा गफला आठ वर्षांनंतर उघडकीस आला हे विशेष. मागील अनेक वर्षांत शेतीचे पंचनामे झाले. मात्र, मदत भेटली नाही अशा स्वरुपाच्या तक्रारी शेतक-यांतून होत असतानाही कुठलीच खातरजमा होत नव्हती. आज दाखल झालेल्या फिर्यादीनंतर पोलिस निरीक्षक विजय करे अधिक तपास करीत आहेत.

Web Title: Newase Farmers Checks Police Station Last Night

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..