भारत बंद : नगर जिल्ह्यात कोणत्या तालुक्यात कशी स्थिती वाचा एकाच क्लिकवर

अशोक मुरुमकर
Tuesday, 8 December 2020

दिल्ली येथे सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी आणि शेतकरीविरोधी कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी पुकारलेल्या देशव्यापी बंदमध्ये नगर जिल्ह्यात मंगळवारी सकाळी संमीश्र प्रतिसाद जाणवला.

अहमदनगर : दिल्ली येथे सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी आणि शेतकरीविरोधी कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी पुकारलेल्या देशव्यापी बंदमध्ये नगर जिल्ह्यात मंगळवारी सकाळी संमीश्र प्रतिसाद जाणवला.

सकाळी नगर सोलापूर महामार्गावर नेमहपेक्षा वाहनांची संख्या कमी होती. तर नगर शहरात सकाळी फारसा परिणाम जाणवला नाही. जिल्ह्यात मात्र, कमी अधिक प्रमाणात परिणाम जाणवत होता. या बंदमध्ये सहभागी होण्याचे विविध राजकीय पक्षासह संघटनांनी आवाहन केले आहे.

संगमनेरमध्ये भारत बंदला संमिश्र प्रतिसाद दिसत आहे. वाहतुक मात्र, मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरूच आहे. मुख्य बाजारपेठ व नवीन नगर रोड परिसरातील दुकाने बंद आहेत. तर शहरालगतच्या ग्रामीण भागातील व्यवहार काही प्रमाणात सुरू आहेत, असे येथील बातमीदार आनंद गायकवाड यांनी सांगितले आहे. 

नेवासे तालुक्यात भारत बंदला संमिश्र प्रतिसाद दिसत असल्याचे बातमीदार सुनिल गर्जे यांनी सांगितले.

कर्जत तालुक्यात भारत बंदला संमिश्र प्रतिसाद आहे. मात्र अनुचित घटना घडू नये म्हणून मोठा पोलिस बंदोबस्त तैनात केला असल्याचे बातमीदार निलेश दिवटे यांनी सांगितले.

पारनेर तालुक्यात बंदला संमिश्र प्रतिसाद, असल्याचे मार्तंड बुचुडे यांनी सांगितले.

श्रीरामपूरमध्ये भारत बंदच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी बंदोबस्त ठेवला आहे. सकाळी फारसा परिणाम जाणवला नाही. मात्र, काही वेळा कसे वातावरण होईल, हे पहावे लागणार असल्याचे बातमीदार गौरव साळुंके यांनी सांगितले. भारत बंदच्या पार्श्वभुमीवर येथील नेवासा-संगमनेर रस्त्यावरील शिवाजी चौकात चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

शेवगावमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला असल्याचे बातमीदार सचिन सातपुते यांनी सांगितले.

केंद्र सरकारने शेतकरी प्रतिनीधीसह संघटनांशी चर्चेशिवाय कृषी संबंधित कायदे मंजूर केले. संसदेत चर्चा करण्यात आली नाही. कोणत्याही शेतकरी संघटनेने मागणी केली. नसताना शेतकरी हिताच्या नावाखाली सदर कायदे शेतकऱ्यांच्या माथी मारले. हे लोकशाही प्रक्रियेला धरून नाही. स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशींबाबत त्यांनी घूमजाव केले आहे.

तोंडी आश्वासनाऐवजी शेतकऱ्यांना आधारभूत किमतीचा कायदा हवा आहे. तसेच आंदोलनातून मार्ग काढण्याऐवजी केंद्र सरकार दडपशाही करून आंदोलन मोडीत काढण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे शेतकरी संघटनांनी पुकारलेल्या देशव्यापी भारत बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: News of Bharat Bandh in Ahmednagar district in one clik