नगरमध्ये रात्रीचा लॉकडाउन या तारखेपर्यंत

अमित आवारी
Friday, 31 July 2020

सिनेमा हॉल्स, व्यायाम शाळा, क्रीडा संकुले, जलतरण तलाव, मनोरंजन पार्क, नाट्यगृह, बार, पेक्षागृहे, प्रार्थना गृहे आदी ठिकाणे बंद राहतील.

नगर : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा एक भाग म्हणून नागरिकांना सार्वजनिक ठिकाणी एकत्र जमा होण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे.

जिल्ह्यात रस्त्यावर, सार्वजनिक वाहतुकीचे रस्त्यावर, गल्लोगल्ली याठिकाणी संचार, वाहतूक, फिरणे, उभे राहणे, थांबुन राहणे, रेंगाळणे असे कृत्य करण्यास 31 ऑगस्टपर्यंत मनाई राहील.

अत्यावश्‍यक सेवा वगळता इतर कामांसाठी व्यक्‍तींच्या फिरण्यावर सायंकाळी 7 ते सकाळी 5 या कालावधीत निर्बंध राहील. 

हेही वाचा - पाथर्डीत कर्जमाफीचा घोटाळा

सर्व बिगर-अत्यावश्‍यक बाजारपेठा, दुकाने सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत खुली राहतील. सार्वजनिक ठिकाणी पाच किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्‍ती एकत्र येण्यास मनाई राहील.

सिनेमा हॉल्स, व्यायाम शाळा, क्रीडा संकुले, जलतरण तलाव, मनोरंजन पार्क, नाट्यगृह, बार, पेक्षागृहे, प्रार्थना गृहे आदी ठिकाणे बंद राहतील. सर्व प्रकारचे सामाजिक, राजकीय, क्रीडा, मनोरंजन, शैक्षणिक, सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रम आदीसाठी सार्वजनिकरित्या एकत्र येण्यास मनाई राहील. सर्व प्रकारचे धार्मिक स्थळे बंद राहतील. 

पाच ऑगस्टपासून हे सुरू होईल 
मॉल्स आणि बाजारसंकूले (थिएटर वगळून) , मॉलमधील रेस्टॉरंट्‌स व फूड कोर्टसचे किचन यांना स्थानिक प्राधिकरणाचे एसओपी नुसार होम डिलिव्हरीची परवानगी असेल. बिगर समूह बाह्य क्रीडा प्रकारांस शारीरिक अंतर ठेवून व स्वच्छतेच्या उपाय योजनांसह परवानगी असेल. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Night lockdown in town until 31st August