
अहिल्यानगर: चोरट्यांनी एकाच रात्री शहरातील चितळे रोड, सर्जेपुरा भागातील चार दुकांनांवर डल्ला मारला. काही ठिकाणाहून रोख रक्कम चोरली, तर काही ठिकाणी चोरीचा प्रयत्न केला. सोमवारी (ता. ४) पहाटे हा प्रकार घडला. दुचाकीवरून आलेले हे चोरटे सीसीटीव्हीमध्ये कैद झाले आहेत. दरम्यान, या प्रकारामुळे शहरातील व्यावसायिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.