राळेगण सिद्धीची निकिता पोटे झाली "मिस इंडिया"

अमित आवारी
Monday, 11 January 2021

निकिता पोटे या प्रा. डॉ. विजय पोटे यांच्या पुतणी, तसेच मुंबई पोलिसमध्ये असलेले संजय पोटे यांच्या कन्या आहेत. गोव्यात झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत निकिता यांनी महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले.

नगर ः ग्रामविकासात राळेगणसिद्धीचे नाव जगात गेले आहे. त्याच राळेगणच्या कन्येने गावची मान उंचावली आहे. राष्ट्रीय स्तरावरील "मिस इंडिया' म्हणून निकिता संजय पोटे यांची निवड झाली आहे. पोटे कुटुंबाचे मूळ गाव राळेगणसिद्धी (ता. पारनेर) आहे.

गोवा येथे "मिस इंडिया ग्लोबल 2020 टॅलेंटिका' या आंतरराष्ट्रीय संस्थेतर्फे नुकत्याच आयोजित स्पर्धेत निकिता यांनी राष्ट्रीय स्तरावरील प्रथम क्रमांकाचे मानांकन मिळविले. आता त्या आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाचे प्रतिनिधित्व करणार आहेत. 

हेही वाचा - मोबाईल मॅपने केला घात, तीन पुणेकर गेले धरणात

निकिता पोटे या प्रा. डॉ. विजय पोटे यांच्या पुतणी, तसेच मुंबई पोलिसमध्ये असलेले संजय पोटे यांच्या कन्या आहेत. गोव्यात झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत निकिता यांनी महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले.

अंतिम फेरीत त्या पहिल्या पाच स्पर्धकांमध्ये चमकल्या. यापूर्वी त्यांना "इंडियाज नेक्‍स्ट टॉप मॉडेल वेस्टर्न झोन-2019' (महाराष्ट्र) म्हणूनही गौरविण्यात आले. 

टॅलेंटिका ग्लोबल मिस इंडिया स्पर्धेसाठी त्यांना शिवा शरद क्रित, शुभम वर्मा, आई सविता पोटे आदींचे मार्गदर्शन लाभले. निकिता यांच्या या यशाने नगर जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nikita Pote of Ralegan Siddhi became Miss India