लंके कोणाला म्हणाले, रूपावर जाऊ नका, या यड्यानेच अॉनलाईन शिक्षण आणलं

Nilesh Lanka said, I brought online education
Nilesh Lanka said, I brought online education

निघोज : पारनेर नगर मतदार संघाची कौटुंबिक जबादारीची जाणीव असल्याने मी घरून निघतानाच माझ्या गाडीची काच खाली करून निघत असतो. रस्त्यात जनतेच्या अडचणी सोडवत यावे लागते. तेव्हा आपली गाडी म्हणजे जनता बस आहे. कुठेही हात करा थांबेल, असे आमदार निलेश लंके यांनी जवळे येथे बोलताना सांगितले.   

आमदार लंके यांच्या प्रयत्नांतून विविध विकासकामाचे जवळा (ता.पारनेर) येथे  भूमिपूजन, उदघाटन व लोकार्पण सोहळा पार पडला.

या वेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बाजार समितीचे सभापती प्रशांत गायकवाड हे होते. यावेळी राष्ट्रवादी कॉग्रेसचे  तालुकाध्यक्ष बाबाजी तरटे,  सरपंच रत्नमाला शिंगाडे, उपसरपंच किसनराव रासकर, उद्योजक बाळासाहेब  सालके, सरपंच ठकाराम लंके, सरपंच पंकज कारखीले, डॉ. आबासाहेब खोडदे, माजी सभापती सुदाम पवार, आण्णा बढे, प्रदीप सोमवंशी, संभाजी खामकर, ग्रा सदस्य, कानिफ पठारे, नाथा रासकर, राजू लोखंडे,संदीप सालके, भाऊ आढाव, अरुण रासकर, नवनाथ रासकर , संभाजी आढाव, संतोष सालके, राजू आढाव, रामदास गाडीलकर, गोपी पठारे, पोपट पिसाळ, भगवान सालके आदी उपस्थित होते.

लंके म्हणाले की, कुणीही कुणाच्या रूपावर जाऊ नका. तालुक्यात काहीजण म्हणत होते. तालुका चालवणे म्हणजे येड्यागबाळ्याचे काम नाही. येड्यांच्या हातात सत्ता देणार का पण या येड्यांनीच राज्याने आदर्श घ्यावा असे ऑनलाईन शिक्षण पुढे आणले.

आपण त्यांना उगच शहाणे समजायचो 

लॉकडाउनच्या काळातही तालुक्यात गेली १५ वर्षे रखडलेली विकास कामे केली. सुमारे दोन ते अडीच लाख लोकांना जेवणाची व्यवस्था केली. जनतेची कामे करण्यासाठी 'पर्सनॅलिटी' ची नाही तर 'पॉझिटिव्ह एनर्जी'ची गरज आहे. हे मला जनतेकडून कळले. आपण उगाचच 'त्यांना' शहाणे समजत होतो, असा टोलाही लंके यांनी विरोधकांचे नाव न घेता लगावला.

संपादन - अशोक निंबाळकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com