Ahilyanagar News : धार्मिक संवेदनशीलता अबाधित ठेवण्याची सरकारला सूचना; खा. नीलेश लंके यांची मंदिर परिसराला भेट!

Nilesh Lanke : दिल्लीतील बुलडोझर कारवाईनंतर बाबा पीर रतननाथ मंदिर परिसरात निर्माण तणाव पाहता खासदार नीलेश लंके यांनी भेट देऊन भक्तांना दिलासा दिला. धार्मिक भावना अबाधित ठेवण्यासाठी त्यांनी मंदिर समितीला ठाम पाठिंबा दिला.
Nilesh Lanke visits Baba Peer Ratan Nath Temple, Delhi bulldozer controversy, religious sentiments

Nilesh Lanke visits Baba Peer Ratan Nath Temple, Delhi bulldozer controversy, religious sentiments

Sakal

Updated on

पारनेर : दिल्लीतील झंडेवालान परिसरातीcल बाबा पीर रतननाथ मंदिराच्या जमिनीवर महानगरपालिकेने केलेल्या बुलडोझर कारवाईनंतर स्थानिक भक्त आणि नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे. धार्मिक भावनांना धक्का बसल्याचा आरोप होत असून हे प्रकरण राष्ट्रीय पातळीवर चर्चेचा विषय ठरले आहे. अशा संवेदनशील वातावरणात खासदार नीलेश लंके यांनी मंदिराला भेट देऊन परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी करत भाविकांना धीर दिला. महानगरपालिकेच्या कारवाईनंतर मंदिर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, कारवाई करताना ना पूर्वसूचना देण्यात आली, ना मंदिर व्यवस्थापनाशी चर्चा करण्यात आली. त्यामुळे धार्मिक परंपरा आणि श्रद्धेचा अनादर झाल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com