
पारनेर : अहिल्यानगर लोकसभा मतदारसंघात सुरू असलेल्या जलजीवन योजनांमध्ये मोठा गैरव्यवहार झाला आहे. मतदारसंघात जलजीवन मिशन योजनेअंतर्गत ८३० पाणी योजना मंजूर आहेत. या पाणी योजनांच्या कामांची केंद्रीय समितीमार्फत चौकशी करावी, अशी मागणी खासदार नीलेश लंके यांनी मंगळवारी (ता.११) लोकसभेत केली.