खासदार नको; तुम्ही आर. आर. आबा व्हा; माजी आमदार झावरेंचा नीलेश लंकेंना कानमंत्र | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

nilesh lanke
खासदार नको; तुम्ही आर. आर. आबा व्हा; माजी आमदार झावरेंचा नीलेश लंकेंना कानमंत्र

खासदार नको; तुम्ही आर. आर. आबा व्हा

टाकळी ढोकेश्वर: ‘‘तुम्हाला राजकीय भवितव्य मोठे आहे. पक्षातील मंत्री राजेश टोपे, धनंजय मुंडे यांच्यासह राज्यभरातील लोक तुम्हाला कार्यक्रमांना बोलवितात. कोविड सेंटरचे काम राज्यासह देशात गेले. तुम्ही तालुक्याचे नेतृत्व करा, राज्याचे आर. आर. पाटील व्हा. लोकसभा निवडणूक लढवू नका,’’ असा कानमंत्र आमदार नीलेश लंके यांना जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे अध्यक्ष व माजी आमदार नंदकुमार झावरे यांनी दिला.

हेही वाचा: प्रवाशांना त्रास होऊ नये यासाठी ST संपकऱ्यांशी चर्चा करुन तोडगा काढा - HC

टाकळी ढोकेश्वर (ता. पारनेर) येथे नगर-कल्याण महामार्ग ते ढोकेश्वर विद्यालय या रस्त्याचे भूमिपूजन झावरे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार नीलेश लंके, संस्थेचे विश्वस्त सीताराम खिलारी, माजी सभापती राहुल झावरे, गंगाराम बेलकर, मारुती रेपाळे, संभाजी रोहकले, दादाभाऊ सोनावळे, सरपंच सुनीता खिलारी,उपसरपंच सुनील चव्हाण, दत्तात्रय निवडुंगे उपस्थित होते.

आमदार लंके म्हणाले, की हा रस्ता ज्ञानमंदिरासाठी केला जातोय, याचे समाधान वाटते. ‘जिल्हा मराठा’ने तालुक्यात शिक्षणाचे दार खुले केले. संस्थेचा गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यावर भर असतो. संस्थेला सर्वतोपरी सहकार्य करू.

हेही वाचा: सत्ताधीशांनी दररोज आत्मपरीक्षण करावे: सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा

लक्ष्मणरेषा पार करणार नाही : लंके

लोकसभा निवडणूक लढवू नका, असा सल्ला माजी आमदार नंदकुमार झावरे यांनी दिल्यानंतर आमदार नीलेश लंके यांनी, मी तुमचा शिष्य आहे. तुमचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून माझे काम सुरू आहे. तुम्ही घालून दिलेली लक्ष्मणरेषा पार करणार नाही, असा शब्दही दिला.

loading image
go to top