
अहिल्यानगर: विळद बाह्यवळण (ता. नगर) ते सावळीविहीर (ता. राहाता) या ७५ किलोमीटरच्या रस्त्याचे काम तत्काळ सुरू करण्याच्या मागणीसाठी खासदार नीलेश लंके यांनी आपल्या सहकाऱ्यांसह शुक्रवारी (ता.११) दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषणास प्रारंभ केला. महामार्गाच्या कामास प्रारंभ झाल्याशिवाय माघार घेणार नाही, असा निर्धार खासदार लंके यांनी केला आहे.