
पारनेर : राज्यात नाफेडमार्फत खरेदी करण्यात येणाऱ्या सोयाबीन खरेदीसाठीची मुदतवाढ देण्याच्या मागणीसाठी गेल्या काही दिवसांपासून खासदार नीलेश लंके आग्रही होते. त्यासाठी संसदेसमोर त्यांनी आंदोलनही केले होते, त्यांच्या या पाठपुराव्यास यश आले असून, केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी महाराष्ट्रातील सोयाबीन खरेदीसाठी २४ दिवसांची मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे.