

Nilwande Dam Water Storage Drops After Rain Break Farmers Watch Future Irrigation Rotations And Water Availability
sakal
अकोले : निळवंडे धरणातील पाणीसाठ्यात गेल्या पंधरा दिवसांत सुमारे दहा टक्क्यांची घट झाली आहे. पाणलोट क्षेत्रात पावसाने उघडीप घेतल्याने धरणात नव्याने पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे. त्यामुळे लाभक्षेत्रातील शेतीसाठी पाण्याचे नियोजन करण्याचे आव्हान निर्माण झाले आहे. भंडारदरा आणि निळवंडे ही दोन्ही धरणे यंदाच्या पावसाळ्यात पूर्ण क्षमतेने भरली होती.