esakal | निमगाव गांगर्डा, राक्षसवाडी बिनविरोध, दिघी, तिखीत एका जागेसाठी निवडणूक
sakal

बोलून बातमी शोधा

Nimgaon Gangarda, Rakshaswadi unopposed Gram Panchayat unopposed

तालुक्‍यात मिरजगाव, पाटेगाव, चिलवडी या मोठ्या ग्रामपंचायतीत महाविकास आघाडी विरुद्ध भाजप असे लढतीचे चित्र आहे. 

निमगाव गांगर्डा, राक्षसवाडी बिनविरोध, दिघी, तिखीत एका जागेसाठी निवडणूक

sakal_logo
By
नीलेश दिवटे

कर्जत : तालुक्‍यातील 56 ग्रामपंचायतींपैकी राक्षसवाडी खुर्द आणि निमगाव गांगर्डा या दोन ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. माजी मंत्री (कै.) आबासाहेब निंबाळकर यांचे मूळ गाव असलेल्या दिघी ग्रामपंचायतीत सातपैकी सहा जागा बिनविरोध झाल्या आहेत. तेथे एका जागेसाठी दुरंगी लढत होत आहे. 

तिखी येथे सुद्धा सहा जागा बिनविरोध झाल्या असून, एका जागेसाठी दोन उमेदवार रिंगणात आहेत. यामुळे 54 ग्रामपंचायतीत चुरशीची निवडणूक होत आहे. आमदार रोहित पवार आणि भाजपचे माजी मंत्री प्रा. राम शिंदे व खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या समर्थकांत या निवडणुकीत घमासान पहावयास मिळणार आहे. 

कॉंग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष अॅड. कैलास शेवाळे, राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष रघुनाथ काळदाते, कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रा. किरण पाटील, भाजपचे तालुकाध्यक्ष डॉ. सुनील गावडे, जिल्हा परिषद सदस्य गुलाब तनपुरे, राष्ट्रवादी डॉक्‍टर सेलचे डॉ. चंद्रकांत कोरडे, माजी पंचायत समिती सदस्य डॉ. पंढरीनाथ गोरे व संग्राम पाटील, शिवसेना नेते अमृत लिंगडे, माजी उपसभापती प्रशांत बुद्धिवंत यांच्या गावातही निवडणूक रंगतदार होणार आहे. 

हेही वाचा -  आदर्शगाव हिवरेबाजार पाठोपाठ राळेगणमध्येही दुफळी

तालुक्‍यात मिरजगाव, पाटेगाव, चिलवडी या मोठ्या ग्रामपंचायतीत महाविकास आघाडी विरुद्ध भाजप असे लढतीचे चित्र आहे. 

दिघी ग्रामपंचायत बिनविरोध करण्यासाठी मार्केट कमिटीचे संचालक औदुंबरराजे निंबाळकर, रोहितराजे निंबाळकर, संतोषराजे निंबाळकर, बिभिषणराजे निंबाळकर, मदनराजे निंबाळकर, हिंमतराजे निंबाळकर, ज्ञानदेवराजे निंबाळकर, विठ्ठलराजे निंबाळकर, सोमनाथ महारनवर, गोरक्ष इंगळे, राहुल इंगळे, राजेंद्र खरात, योगेश देवकर, राहुलराजे निंबाळकर, चंद्रकांतराजे निंबाळकर, अंजीर महारनवर, मिलिंदराजे निंबाळकर, अण्णाराजे निंबाळकर, मनोज देवकर, दत्तात्रेय खरात, मंगेशराजे निंबाळकर आदींंनी प्रयत्न केले. 

बिनविरोध सदस्य असे - स्वाती निंबाळकर, सहदेव खरात, तेजस्विनी निंबाळकर, उर्मिला निंबाळकर, फुलनबाई महारनवर महेंद्र थोरात. दोन नंबरच्या वार्डात बेबी इंगळे व संदेश इंगळे यांच्यात लढत होत आहे. 

संपादन - अशोक निंबाळकर

loading image