दागिने ठेवा आणि प्रत्येक महिन्याला एका तोळ्यामागे एक हजार रुपये मिळवा; खोट्या योजनेत लाखोंची फसवणूक

गौरव साळुंके
Friday, 13 November 2020

दागिने ठेवा आणि प्रत्येक महिन्याला एका तोळ्यामागे एक हजार रुपये मिळवा, अशा फसव्या योजनेत येथील एका सोनाराने कोकमठाण (ता. कोपरगाव) येथील एका महिलेची नऊ लाख रुपयांची फसवणूक केली.

श्रीरामपूर (अहमदनगर) : दागिने ठेवा आणि प्रत्येक महिन्याला एका तोळ्यामागे एक हजार रुपये मिळवा, अशा फसव्या योजनेत येथील एका सोनाराने कोकमठाण (ता. कोपरगाव) येथील एका महिलेची नऊ लाख रुपयांची फसवणूक केली. योगिता पवार (वय 34, रा. कोकमठाण) यांनी याबाबत फिर्याद दिली. 

नगर जिल्ह्यातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
याप्रकरणी बाळासाहेब डहाळे, अक्षय डहाळे यांच्या विरोधात शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. यातील बाळासाहेब डहाळे यांना ताब्यात घेतले आहे. कोकमठाण येथील वैष्णवी अलंकार गृहामध्ये "ज्वेलरी गोल्डी' योजनेचे आमिष दाखवून सोने जमा करून, एका तोळ्यामागे प्रत्येक महिन्याला एक हजार रुपये देणार असल्याचे सांगण्यात आले. या योजनेत 29 तोळे सोन्याच्या दागिन्यांसह रोख 60 हजार रुपयांची गुंतवणूक केली. प्रारंभी काही दिवस योजनेचा लाभ मिळत गेला. पुढे संबंधित सोनाराचे दुकान बंद पडल्याने योजनेचा लाभ न देता थेट लाभाच्या रकमेचे वाढीव सोने देणार असल्याचे सांगण्यात आले. मात्र, त्यात नऊ लाख 33 हजार रुपयांची फसवणूक झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. 

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nine lakh fraud of a woman in Shrirampur taluka