'मुळा एज्युकेशन'चे नऊ विद्यार्थ्यांची सैन्य दलात निवड

सुनील गर्जे
Thursday, 24 December 2020

मुळा एज्युकेशन सोसायटीच्या नेवासे येथील श्री ज्ञानेश्वर व सोनई येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील राष्ट्रीय छत्र सेना  (एनसीसी) विभागातील नऊ विद्यार्थ्यांची भारतीय सैन्य दलात (पायदळ) सैनिक म्हणून निवडी झाल्या आहे.

नेवासे (अहमदनगर) : मुळा एज्युकेशन सोसायटीच्या नेवासे येथील श्री ज्ञानेश्वर व सोनई येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील राष्ट्रीय छत्र सेना  (एनसीसी) विभागातील नऊ विद्यार्थ्यांची भारतीय सैन्य दलात (पायदळ) सैनिक म्हणून निवडी झाल्या आहे.
  
फेब्रुवारी २०२० मध्ये झालेल्या भारतीय सैन्य दलाच्या विविध पदांच्या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून त्यात 'ज्ञानेश्वर'चे छात्र सैनिक दशरथ फरे, विशाल तावरे, प्रवीण आगळे, ऋषिकेश कोरहाळे, अक्षय चव्हाण हे पाच तर सोनई'चे देविदास गडाख, महेश जाधव, कानिफनाथ सांगळे, योगेश आयनर याचार असे मुळा एज्युकेशनचे नऊ छात्र सैनिकांची सैन्यदलात निवड झाली आहे. त्यांना एनसीसी विभागाचे प्रमुख कॅप्टन प्रा.डॉ. सुभाष आगळे, कॅप्टन प्रा. डॉ. सुरेश जाधव यांचे मार्गदर्शन लाभले आहे.

हे ही वाचा : अयोध्येतील राम मंदिर लोकवर्गणीतून उभे राहणार 
 
या विद्यार्थ्यांचा मुळा एज्युकेशन व सोनई महाविद्यालयाच्यावतीने प्राचार्य डॉ. शंकर लावरे यांच्या हस्ते व उपप्राचार्य डॉ. ज्ञानदेव झिने, कॅप्टन डॉ. सुरेश जाधव,  डाॅ मच्छिंद्र वर्पे, डॉ. योगेश साळवे, डॉ. रवींद्र खंदारे यांच्या उपस्थितीत गौरव करण्यात आला.

मुळा उद्योग समूहाचे संस्थापक ज्येष्ठ साहित्यिक यशवंतराव गडाख यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेचे अध्यक्ष प्रशांत पाटील गडाख यांनी नेवासे व सोनई सारख्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शहरी भागात मिळणाऱ्या शैक्षणिक, क्रीडासह विविध सुविधा उपलब्ध करून दिल्यामुळे आम्हाला हे यश आले असल्याच्या  भावना यावेळी विद्यार्थ्यांनी सत्कारावेळी व्यक्त केल्या.

या विद्यार्थ्यांचे ज्येष्ठ साहित्यिक यशवंतराव गडाख,  जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख, अध्यक्ष प्रशांत पाटील गडाख, सचिव उत्तम लोंढे, प्राचार्य डॉ. गोरक्षनाथ कल्हापूरे, प्राचार्य डॉ. शंकर लावरे, उपप्राचार्य डॉ. ज्ञानदेव झिने यांनी अभिनंदन केले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nine students of Mula Education have been selected for the Army