
गेल्या 15 दिवसांपासून मुख्याधिकारी ढेरे रजेवर होते. त्यांनी काल (सोमवारी) अचानक कार्यालयास भेट देत कामाचा आढावा घेतला.
श्रीरामपूर ः पालिकेतील गैरहजर अधिकारी-कर्मचाऱ्यांना मुख्याधिकारी ज्ञानेश्वर ढेरे यांनी दणका दिला. पालिकेच्या कार्यालयीन कामकाजाच्या वेळेत उपस्थित नसल्याने दिवसभराची गैरहजेरी लावतानाच 37 जणांना "कारणे दाखवा' नोटीसा बजावल्या आहेत.
हेही वाचा - सर्वांसाठी घरे बांधून देण्याचा प्रयत्न
गेल्या 15 दिवसांपासून मुख्याधिकारी ढेरे रजेवर होते. त्यांनी काल (सोमवारी) अचानक कार्यालयास भेट देत कामाचा आढावा घेतला. त्यावेळी पालिकेच्या बांधकाम, आरोग्य, पाणीपुरवठा, अतिक्रमण विभागांतील 37 अधिकारी-कर्मचारी गैरहजर आढळून आल्याने मुख्याधिकारी ढेरे यांनी नाराजी व्यक्त केली.
गैरहजर कर्मचाऱ्यांची माहिती घेत 37 जणांना "कारणे दाखवा' नोटीस बजावली. पालिकेच्या कार्यालयीन कामकाजाच्या वेळेत सर्वांनी वेळेतच उपस्थित राहण्याची सुचना केली. गैरहजर आढळून आल्यास संबंधित अधिकारी-कर्मचाऱ्यांची दिवसभराची गैरहजेरी लावून कारवाई करण्याचा इशारा मुख्याधिकारी ढेरे यांनी दिला.
अधिकारी-कर्मचाऱ्यांनी जबाबदारीने काम करावे, असे आवाहन मुख्याधिकारी ढेरे यांनी केले. अहमदनगर