esakal | शून्य निकाल लागलेल्या शाळांच्या शिक्षकांना नोटीस
sakal

बोलून बातमी शोधा

शून्य निकाल लागलेल्या शाळांच्या शिक्षकांना नोटीस

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेतलेल्या पूर्व उच्च प्राथमिक (पाचवी) शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल मागील वर्षाच्या तुलनेत वाढला.

शून्य निकाल लागलेल्या शाळांच्या शिक्षकांना नोटीस

sakal_logo
By
दौलत झावरे

अहमदनगर : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेतलेल्या पूर्व उच्च प्राथमिक (पाचवी) शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल मागील वर्षाच्या तुलनेत वाढला असला, तरी या वर्षी शून्य निकाल लागलेल्या शाळांतील शिक्षकांसह मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख व विस्तार अधिकाऱ्यांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. 

नगर जिल्ह्यातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल वाढविण्यासाठी प्राथमिक शिक्षण विभागाकडून प्रयत्न केले जात आहेत. यामध्ये विद्यार्थ्यांच्या पाच सराव परीक्षा, शिष्यवृत्ती परीक्षेचा शिक्षण समितीत दरमहा आढावा, पर्यवेक्षकीय अधिकाऱ्यांना शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल उंचावण्यासाठी उद्दिष्ट, तसेच सराव परीक्षेच्या निकालाचे विश्‍लेषण करण्यासाठी सॉफ्टवेअर तयार करण्यात आले आहे. याबरोबरच व्हॉट्‌सऍप ग्रुप तयार करून शाळांच्या तयारीचा आढावा तालुकानिहाय घेण्यात येत आहे.

तसेच, तालुकास्तरावरही शिष्यवृत्ती कार्यशाळा व सराव परीक्षेचे नियोजन करण्यात आले. असे असतानाही जिल्ह्यातील अनेक शाळांचा निकाल शून्य टक्के लागला आहे. अशा शाळांतील 247 शिक्षक, 213 मुख्याध्यापक, 90 केंद्रप्रमुख व 42 विस्तार अधिकाऱ्यांना प्राथमिक शिक्षक विभागातर्फे नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. या नोटिसांमध्ये, निकाल कमी लागल्याबद्दल खुलासा मागविण्यात आला आहे. आता प्राथमिक शिक्षण विभाग यावर काय कारवाई करतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.  

संपादन : अशोक मुरुमकर

loading image
go to top