या प्रकरणी राहुरी पोलिस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल झाला असून, आरोपीला अटक करण्यात आली आहे. राधाकिसन रायभान बडदे (वय 40, रा. तनपुरे खळवाडी, राहुरी) असे आरोपीचे नाव आहे.
राहुरी : मुतखड्याच्या औषधात गुंगीचे औषध टाकून येवला (जि. नाशिक) येथील एका अल्पवयीन मुलीवर राहुरी येथे एकाने बलात्कार केला. व्हिडिओ व फोटो काढून तो वारंवार अत्याचार करीत होता.
या प्रकरणी राहुरी पोलिस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल झाला असून, आरोपीला अटक करण्यात आली आहे. राधाकिसन रायभान बडदे (वय 40, रा. तनपुरे खळवाडी, राहुरी) असे आरोपीचे नाव आहे.
हेही वाचा - गुंगीचे औषध देऊन मुलीवर वैद्याचा अत्याचार
अधिक माहिती अशी ः अल्पवयीन पीडित मुलीला मुतखड्याचा त्रास होऊ लागल्याने ती आरोपीकडे आली. आरोपी बडदे याने मुतखड्याचे औषध म्हणून गुंगीचे औषध पाजले. पीडित गुंगीत असताना तिच्यावर अत्याचार केला. आरोपीने पीडितेचा फोटो व व्हिडिओ काढला. तो व्हायरल करण्याचा धाक दाखवून 5 सप्टेंबर 2018 ते 16 डिसेंबर 2019दरम्यान आरोपीने वारंवार अत्याचार केला, असे पीडितेने फिर्यादीत म्हटले आहे.