श्रीगोंद्यात कोरोनाचा होतोय उद्रेक; आरोग्य कर्मचाऱ्यांची सुरूय कसरत

The number of corona is increasing in Shrigonde taluka
The number of corona is increasing in Shrigonde taluka

श्रीगोंदे (अहमदनगर) : शहरासह तालुक्‍यात 'लॉकडाउन' पाळला जात असला, तरी रुग्णांची झपाट्याने वाढणारी संख्या काळजीत टाकणारी आहे. बुधवारी सायंकाळपर्यंत तालुक्‍यात कोरोनाबाधित 218 रुग्ण ऍक्‍टिव्ह होते. शहरातील कोविड केंद्रांत रुग्णांसाठी जागा शिल्लक नसल्याने प्रशासनाची दमछाक सुरू आहे. दरम्यान, कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी आरोग्य यंत्रणा एकटीच आघाडीवर लढत असल्याचे चित्र असून, अन्य विभागाची याबाबतची उदासीनता चिंतेचा विषय आहे.

एसटी चालकाला मारहाण करणाऱ्या चौघांना शिक्षा
 
तालुक्‍यात काही महिन्यांपासून शांत असलेल्या कोरोनाने पुन्हा एकदा डोकेवर काढले आहे. आठवड्यात कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा कमालीचा वाढल्याने प्रशासनाची दमछाक वाढली आहे. बुधवारी सायंकाळपर्यंत ऍक्‍टिव्ह 218 रुग्ण होते. आजचा आकडा समजला नव्हता. दरम्यान, यातील 92 रुग्ण शहरातील कोविड सेंटरमध्ये उपचार घेत असून, तेथे आता जागा शिल्लक नाही. 88 रुग्ण खासगी रुग्णालयांत, तर उर्वरित 'होम क्वारंटाईन' केले असल्याची माहिती तहसीलदार प्रदीपकुमार पवार व तालुका आरोग्य अधिकारी डॉ. नितीन खामकर यांनी दिली. 

कोरोनाविरुद्धच्या लढ्यात तालुक्‍यात आरोग्य विभागाचे अधिकारी, कर्मचारी, आशा वर्कर फ्रंटवर लढा देत असतानाच, अन्य विभागांचे कर्मचारी मात्र कमी संख्येने यात सामील झाले आहेत. परिणामी, आरोग्य यंत्रणेवर कमालीचा ताण आला आहे. तरीही त्यांनी कुठलीही तक्रार न करता कामाचा वेग कायम ठेवला आहे. 

काष्टी, बेलवंडी पाच दिवस बंद 

तहसीलदार पवार, बेलवंडीचे पोलिस निरीक्षक संपत शिंदे यांनी बेलवंडी व पिंपळगाव पिसे भागात पाहणी केली. बेलवंडी येथील वाढती रुग्णसंख्या पाहता, गाव शुक्रवारी रात्रीपासून पाच दिवस 'लॉकडाउन' करण्याचा निर्णय घेण्यात आला. काष्टीतही हीच स्थिती असल्याने, तेही गाव पाच दिवस बंद ठेवण्याचा निर्णय झाला. अत्यावश्‍यक सेवा वगळता सर्व व्यवहार बंद राहतील, अशी माहिती तहसीलदार पवार यांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com