नगरमध्ये कोरोनाबाधितांचा आकडा साडेसहा हजाराकडे

The number of Corona victims in the city is around six and a half thousand
The number of Corona victims in the city is around six and a half thousand

नगर ः जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या साडेसहा हजारांच्या दिशेने जात आहे. आज (सोमवारी) दिवसभरात एकूण 435 जण बाधित आढळून आल्याने, जिल्ह्याची रुग्णसंख्या 6346 झाली आहे.

या मध्ये जिल्हा रुग्णालयातील लॅबमध्ये 43, अँटिजेन चाचणीत 194 व खासगी प्रयोगशाळेत 198 जण बाधित आढळून आले.

जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या 6346 झाली असून, त्यांतील 4025 जण बरे झाले आहेत. 2243 जणांवर सध्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सोमवारी (ता. तीन) दुपारी बारा वाजता जिल्हा रुग्णालयातून आलेल्या अहवालांमध्ये 43 जण पॉझिटिव्ह आढळून आले.

यामध्ये महापालिका हद्दीत 28, संगमनेर दोन, पाथर्डी एक, नगर ग्रामीण तीन, कॅंटोन्मेंट तीन, पारनेर तीन, शेवगाव एक, कोपरगाव एक व जामखेडमधील एक जण पॉझिटिव्ह आढळला. 

अँटिजेन चाचणीत 194 जण पॉझिटिव्ह आढळून आले. त्यांमध्ये महापालिका हद्दीत 54, संगमनेरमध्ये 12, राहात्यात 21, नगर ग्रामीणमध्ये आठ, नेवाशात आठ, श्रीगोंद्यात 17, पारनेरमध्ये आठ, शेवगावमध्ये 29, कोपरगावमध्ये 26, जामखेडमध्ये सहा व कर्जतमध्ये पाच रुग्ण कोरोनाबाधित असल्याचे स्पष्ट झाले. 

खासगी प्रयोगशाळेतील अहवालांनुसार आज एकूण 198 जण पॉझिटिव्ह आढळून आले. यामध्ये महापालिका हद्दीत 164, संगमनेरमध्ये आठ, राहाता एक, पाथर्डीत सात, नगर ग्रामीणमध्ये सहा, श्रीरामपूरमध्ये एक, पारनेरमध्ये दोन, अकोले एक, राहुरी एक, शेवगावमध्ये एक, कोपरगावमध्ये एक, कर्जतमध्ये पाच रुग्ण पॉझिटिव्ह आढळले. 

263 जणांची कोरोनावर मात 
जिल्ह्यातील 263 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना आज घरी सोडण्यात आले. यामध्ये महापालिका हद्दीतील 113 संगमनेर 55, राहाता दहा, पाथर्डी 18, नगर ग्रामीण तीन, श्रीरामपूर आठ, कॅंटोन्मेंट तीन, नेवासे चार, श्रीगोंदे पाच, अकोले 18, राहुरी दोन, कोपरगाव सात, जामखेड एक, कर्जत अकरा व अन्य जिल्ह्यातील पाच जणांचा समावेश आहे. 

संपादन - अशोक निंबाळकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com