नगरमध्ये कोरोनाबाधितांचा आकडा खालावला

सकाळ वृत्तसेवा
Friday, 16 October 2020

रुग्ण बरे होण्याची टक्केवारी 93.89 आहे. दिवसभरात 306 बाधित आढळून आले. त्यामुळे बाधितांची आकडा 52 हजार 442 झाला आहे. त्यातील 803 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या 2402 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. 

नगर ः जिल्ह्यातील 549 रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने, आज त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. आजअखेर 49 हजार 237 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.

रुग्ण बरे होण्याची टक्केवारी 93.89 आहे. दिवसभरात 306 बाधित आढळून आले. त्यामुळे बाधितांची आकडा 52 हजार 442 झाला आहे. त्यातील 803 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या 2402 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. 

जिल्हा रुग्णालयातील तपासणी अहवालात 76 बाधित आढळले. त्यात महापालिका हद्दीत 24, अकोले एक, जामखेड एक, कर्जत एक, कोपरगाव दोन, नगर ग्रामीण तीन, नेवासे दहा, पारनेर सहा, पाथर्डी एक, राहाता सहा, राहुरी तीन, संगमनेर 13, शेवगाव एक, श्रीरामपूरमधील चार रुग्णांचा समावेश आहे. 

खासगी प्रयोगशाळेतील अहवालात 83 बाधित आढळले. त्यात महापालिका हद्दीत 28, अकोले सहा, जामखेड तीन, नगर ग्रामीण सात, नेवासे एक, पारनेर एक, पाथर्डी 15, श्रीगोंदे 15, श्रीरामपूर दोन, कॅन्टोन्मेंट एक व मिलिटरी हॉस्पिटलमधील चौघांचा समावेश आहे. 

अँटीजेन चाचणीत 147 बाधित आढळून आले. त्यात महापालिका हद्दीत 12, अकोले सहा, जामखेड 22, कर्जत दहा, कोपरगाव आठ, नगर ग्रामीण दोन, नेवासे सात, पारनेर आठ, पाथर्डी 16, राहाता 19, संगमनेर 16, शेवगाव नऊ, श्रीगोंदे चार, श्रीरामपूरमधील आठ रुग्णांचा समावेश आहे. 

दरम्यान, जिल्ह्यातील 549 रुग्ण बरे झाल्याने रुग्णालयातून घरी सोडले. त्यात महापालिका हद्दीत बारा, अकोले सहा, जामखेड 22, कर्जत दहा, कोपरगाव आठ, नगर ग्रामीण दोन, नेवासे सात, पारनेर आठ, पाथडी 16, राहाता 19, संगमनेर 16, शेवगाव नऊ, श्रीगोंदे चार, श्रीरामपूरमधील आठ रुग्णांचा समावेश आहे. 

संपादन - अशोक निंबाळकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The number of coronaries in the city dropped