esakal | श्रीरामपूर तालुक्यात ९८ ग्रामपंचायतींमधून हरकती
sakal

बोलून बातमी शोधा

श्रीरामपूर तालुक्यात ९८ ग्रामपंचायतींमधून हरकती

अंतिम प्रभाग रचना 25 सप्टेंबर रोजी प्रसिध्द केलेल्या विधानसभा मतदार याद्यानुसार तलाठी कार्यालय, मंडलाधिकारी कार्यालय, ग्रामपंचायत कार्यालयासह पंचायत समिती कार्यालय आणि तहसील कार्यालयातील सुचना फलकांवर प्रसिध्द केल्या होत्या.

श्रीरामपूर तालुक्यात ९८ ग्रामपंचायतींमधून हरकती

sakal_logo
By
गौरव साळुंके

श्रीरामपूर ः निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार तालुक्‍यातील 27 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणूकांसाठीचा मतदार यादी कार्यक्रम नुकताच जाहीर झाला. एक डिसेंबर रोजी मतदार याद्या जाहीर केल्याच्या पार्श्वभूमीवर हरकती घेण्यासाठी आज अंतिम मुदत होती.

तालुक्‍यातील विविध गावातुन 98 हरकती प्राप्त झाल्याची माहिती तहसीलदार प्रशांत पाटील यांनी दिली. प्रभागनिहाय 27 ग्रामपंचायतींच्या प्रारुप मतदार याद्या प्रसिद्ध केल्या आहेत.

अंतिम प्रभाग रचना 25 सप्टेंबर रोजी प्रसिध्द केलेल्या विधानसभा मतदार याद्यानुसार तलाठी कार्यालय, मंडलाधिकारी कार्यालय, ग्रामपंचायत कार्यालयासह पंचायत समिती कार्यालय आणि तहसील कार्यालयातील सुचना फलकांवर प्रसिध्द केल्या होत्या. त्यावर हरकत नोंदवण्यासाठी आजपर्यंत अंतिम मुदत देण्यात आली होती. त्यावर 98 हरकती प्राप्त झाल्या आहेत. त्यामध्ये मतदाराचे नाव आणि प्रभागातील बद्दल, प्रभाग रचनामधील फरक अशा स्वरूपाच्या हरकती घेतल्या आहेत.

गळनिंब, खोकर, पढेगाव, नायगाव, सराला, गोवर्धनपूर, वडाळा महादेव, गोंडेगाव, मुठेवाडगाव, ब्राह्मणगाव वेताळ, मातापूर, निपाणी वडगावसाठी प्रत्येकी एक तर महांकाळवडगाव, मातुलठाण ग्रामपंचायतीसाठी प्रत्येकी दोन आणि एकलहरे सहा, घुमनदेव सात, टाकळीभान 15, भेर्डापुर 15, बेलापूर 27 हरकती अशा 98 हरकती आल्याची माहिती स्थानिक प्रशासनाने दिली. 

loading image