esakal | पारनेरच्या तहसीलदारबाईंना कर्मचारी, अधिकारी वैतागले, मुख्यमंत्र्यांकडे केली तक्रार
sakal

बोलून बातमी शोधा

Officials lodge a complaint with the Chief Minister against Parner's tehsildar

महसूल कर्मचारी व कामगार तलाठ्यांनी तहसीलदार देवरे यांच्यावर अनेक आरोप केले आहेत. यातून महसूल विभागातील वाद चव्हाट्यावर आला आहे. निवेदनावर कार्यालयातील कर्मचाऱ्यांसह मंडलाधिकारी व कामगार तलाठी, अशा 45 कर्मचाऱ्यांच्या सह्या आहेत.

पारनेरच्या तहसीलदारबाईंना कर्मचारी, अधिकारी वैतागले, मुख्यमंत्र्यांकडे केली तक्रार

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पारनेर ः वयाचा, पदाचा कोणताही विचार न करता तहसीलदार ज्योती देवरे महसूल कर्मचाऱ्यांना अपमानास्पद वागणूक देतात. मनमानी कारभार करीत चौकशीच्या नावाखाली निलंबनाची धमकी देतात. त्याच्या निषेधार्थ "काम बंद' किंवा असहकार आंदोलन करण्याचा इशारा महसूल कर्मचारी व कामगार तलाठ्यांनी दिला आहे. तसे लेखी निवेदन त्यांनी ई-मेलद्वारे मुख्यमंत्री, महसूलमंत्री व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकाऱ्यांना पाठविले आहे. 

निवेदनात महसूल कर्मचारी व कामगार तलाठ्यांनी तहसीलदार देवरे यांच्यावर अनेक आरोप केले आहेत. यातून महसूल विभागातील वाद चव्हाट्यावर आला आहे. निवेदनावर कार्यालयातील कर्मचाऱ्यांसह मंडलाधिकारी व कामगार तलाठी, अशा 45 कर्मचाऱ्यांच्या सह्या आहेत. चौकशीच्या नावाखाली तहसीलदार देवरे मानसिक त्रास देत असल्याचा आरोप निवेदनात केला आहे. 

हेही वाचा - कलेक्शनसाठी भांडणारे चौकशीत म्हणाले आम्ही तर गांधीवादी

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंडलाधिकारी, कामगार तलाठी प्रामाणिकपणे गावोगावी काम करीत आहेत; परंतु तहसीलदार देवरे त्यांनाच अपमानास्पद वागणूक देतात. कर्मचाऱ्यांना सुरक्षा उपाययोजनांसाठी निधी उपलब्ध असतानाही, मास्क अथवा सॅनिटायझर उपलब्ध करून दिले नाही. मंडलाधिकारी व कामगार तलाठ्यांनी आपल्या पगारातून तालुक्‍यातील निवारा केंद्रे चालविली आहेत. त्यासाठी निधी उपलब्ध करून दिला नाही, असा आरोप निवेदनात केला आहे. 

तहसील कार्यालयातील महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांसह मंडलाधिकारी व कामगार तलाठ्यांनी आपल्या विरोधात काय निवेदन दिले, याची माहिती मला नाही. सध्या मी कोरोनाविरुद्धच्या कामात व्यग्र आहे. 
- ज्योती देवरे, तहसीलदार, पारनेर