

Roses Welcome Eco-Friendly Commute as Ahilyanagar Marks ‘No Vehicle Day’
sakal
अहिल्यानगर: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या इंधन बचत व पर्यावरण संरक्षणाच्या अवाहनाला, तसेच राज्य शासनाच्या हरित उपक्रमांना प्रतिसाद देत अहिल्यानगर जिल्ह्यात शुक्रवारी ‘नो व्हेईकल डे’ उपक्रम उत्साहात राबविण्यात आला. अधिकारी व कर्मचारी सायकल, इलेक्ट्रिक वाहन, सार्वजनिक वाहतूक, पायी कार्यालयात पोहोचले. राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना आणि महसूल कर्मचारी संघटनेने गुलाब पुष्प देऊन त्यांचे स्वागत केले.