
अहिल्यानगर : शहरात आज शिवसेनेचा (शिंदे गट) ५९ वा वर्धापनदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. शहराचे ग्रामदैवत श्री विशाल गणपती मंदिरात आरती करून माळीवाडा वेस येथे नागरिकांसह कार्यकर्त्यांना पेढे वाटप करण्यात आले. यावेळी शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी करत महानगरपालिकेवर भगवा फडकविण्याचा संकल्प केला.