esakal | घोडेश्वरीदेवी यात्रेनिमित्त ग्रामस्थांचे घरातूनच दर्शन

बोलून बातमी शोधा

Ghodeshwari Devi Yatra at Ghodegaon
घोडेश्वरीदेवी यात्रेनिमित्त ग्रामस्थांचे घरातूनच दर्शन
sakal_logo
By
विनायक दरंदले

सोनई (अहमदनगर) : घोडेगाव (ता नेवासे) येथील ग्रामस्थांनी कोरोना संसर्गाची स्थिती लक्षात घेवून घोडेश्वरीदेवी यात्रा सोहळ्यानिमित्त दर्शनासाठी मंदिरात न जाता घरातच प्रतिमा पूजन करुन दर्शन घेतले.

येथील यात्रा सोहळा जिल्ह्यात प्रसिद्ध आहे. सध्या कोरोना संसर्गाची स्थिती लक्षात घेवून यात्रा कमिटीने तीन दिवसीय सोहळा रद्दचा निर्णय घेतला होता. मंदिरातील गुरव अदिनाथ माने व इतर चार ग्रामस्थांच्या उपस्थितीत घोडेश्वरीदेवीला साडीचोळीचा मान देण्यात आला. अभिषेक, महापुजा व आरती सोहळा करण्यात आला.

यात्रा कमिटीने आवाहन केल्यानुसार सर्व ग्रामस्थांनी घरातील देवघरात देवीचे पाठ वाचन करुन दर्शन घेतले.अनेकांनी मंदिरात न जाता घरातील देवघरात पुरणपोळीचा नैवेद्य दाखविला. सडारांगोळी, घरांना आंब्याच्या पानांचे तोरण बांधण्यात आले होते. यात्रेनिमित्तचा कावड यात्रा, छबीना, मिरवणूक, फटाक्यांची आतषबाजी, हज-या, कुस्त्यांचा हगामा व सर्व करमणुकीचे कार्यक्रम रद्द करण्यात आले आहे.