वाळकीच्या भालसिंग खूनप्रकरणात एकाला अटक

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 15 December 2020

गुन्हा दाखल झाल्यापासून आरोपी पसार झाले. या गुन्ह्यातील आरोपी इंद्रजित कासार वाळकी येथे आल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिस निरीक्षक अनिल कटके यांना मिळाली.

नगर तालुका ः वाळकी येथील ओंकार बाबासाहेब भालसिंग यास अमानूषपणे मारहाण करून खून केल्याप्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी इंद्रजित रमेश कासार (वय 25, रा. वाळकी) याला अटक केली. 

वाळकी येथे विश्‍वजित प्रतिष्ठानतर्फे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसविण्यास विरोध केल्याच्या रागातून 17 नोव्हेंबर रोजी आरोपी विश्वजित कासार व त्याच्या साथीदारांनी ओंकार भालसिंग याला जबर मारहाण केली.

हेही वाचा - कोपरगावच्या शेतकऱ्याने लावली ड्रॅगन फ्रूटची बाग, आता पैसाच पैसा

पुणे येथे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. याबाबत नगर तालुका पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झाला. गुन्हा दाखल झाल्यापासून आरोपी पसार झाले. या गुन्ह्यातील आरोपी इंद्रजित कासार वाळकी येथे आल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिस निरीक्षक अनिल कटके यांना मिळाली. त्यानुसार पोलिस पथकाने सापळा रचून त्यास अटक केली.

पोलिस हेडकॉन्स्टेबल दत्तात्रेय हिंगडे, संदीप घोडके, सुनील चव्हाण, संदीप पवार, शंकर चौधरी, रवीकिरण सोनटक्के, दीपक शिंदे यांनी ही कारवाई केली. आरोपी इंद्रजित कासार हा सराईत गुन्हेगार असून, त्याच्याविरुद्ध कोतवाली, नगर तालुका, शिवाजीनगर (पुणे) पोलिस ठाण्यांत विविध गुन्हे दाखल आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: One arrested in Bhalsingh murder case