वीज आकडा काढायला आलेल्या अभियंत्याला मारहाण

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 10 December 2020

गांगुर्डे यांच्या फिर्यादीवरून बाबासाहेब चेडवाल यांच्याविरुद्ध राहुरी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. आरोपी पसार आहे. 

राहुरी : तालुक्‍यातील गुंजाळे येथे चोरून घेतलेली वीजजोडणी तोडण्यासाठी गेलेल्या महावितरणच्या कनिष्ठ अभियंत्याला एकाने मारहाण केली. सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी राहुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. 

हेही वाचा -  शेवगावात पकडले औरंंगाबाद, नगरचे प्रतिष्ठित जुगारी

बाबासाहेब चेडवाल (रा. गुंजाळे), असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. महावितरणचे कनिष्ठ अभियंता मंगेश तानाजी गांगुर्डे (वय 30) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, की गुंजाळे येथे सोमवार (ता. सात) सायंकाळी चार वाजता खांबावरून घेतलेल्या केबलमधून बाबासाहेब चेडवाल यांनी चोरून वीजजोडणी घेतल्याचे निदर्शनास आले. त्यांची वीजजोडणी तोडण्यात आली. त्यामुळे, रागाच्या भरात त्यांनी मारहाण करीत सरकारी कामात अडथळा आणला.

गांगुर्डे यांच्या फिर्यादीवरून बाबासाहेब चेडवाल यांच्याविरुद्ध राहुरी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. आरोपी पसार आहे. अहमदनगर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: One beating of an electrical engineer