अहमदनगर : बारागावचे गोड पाणी, पाणीपट्टी भरायची कोणी? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

water-tax

अहमदनगर : बारागावचे गोड पाणी, पाणीपट्टी भरायची कोणी?

राहुरी : बारागाव नांदूरसह चौदा गावे पाणी योजनेची एक कोटींची पाणीपट्टी(water tax) थकल्याने मागील आठवड्यात चार दिवस पाणीपुरवठा खंडित करण्यात आला. योजनेच्या ग्रामपंचायतींनी वसुली मोहीम राबवून, पुढील तारखेचे धनादेश दिल्याने दोन दिवसांपूर्वी योजना पुन्हा सुरू करण्यात आली. परंतु, योजनेतील वळण ग्रामपंचायतीने थकीत पाणीपट्टीचा धनादेश दिला नाही. त्यामुळे, वळण येथे आठवडाभरापासून निर्जळी सुरू आहे. बारागाव नांदूर योजनेद्वारे थेट मुळा धरणातून शुद्ध पिण्याचे पाणी चौदा गावांना नियमित पुरविले जाते. मागील २५ वर्षांपासून योजनेच्या उत्कृष्ट नियोजनामुळे अखंडीत पाणी पुरवठ्यासाठी नावलौकिक असलेल्या योजनेला कोरोना संकटामुळे(corona ) ग्रहण लागले. चौदा ग्रामपंचायतींची पाणीपट्टीची तब्बल एक कोटी रुपयांची थकबाकी आहे. त्यामुळे, महावितरणचे वीजबिल व मुळा पाटबंधारे खात्याची पाणीपट्टी थकली. योजना चालकांनी नाईलाजाने मागील आठवड्यात पाणीपुरवठा बंद केला.

हेही वाचा: अहमदनगर : इथेनॉलनिर्मितीची परवानगी द्या; सदाशिव लोखंडे

सलग तीन दिवस पाणी पुरवठा खंडित झाल्याने, लाभधारक ग्रामपंचायतींच्या ग्रामस्थांनी थकित पाणीपट्टी भरण्यास सुरुवात केली. पाणीपट्टी वसुली सुरू झाल्याने, ग्रामपंचायतींनी पुढील तारखेचे धनादेश देऊन, चौथ्या दिवशी योजना सुरू करण्याचे साकडे घातले. पाचव्या दिवशी योजनेचा पाणीपुरवठा पूर्ववत सुरू झाला. परंतु, वळण ग्रामपंचायतीच्या जलकुंभाचा वनवास आठ दिवसांपासून कायम आहे. वळण ग्रामपंचायतीच्या खातेदाराकडून पाणीपट्टीचे आठ लाख २३ हजार रुपये दोन वर्षांची थकबाकी आहे. ग्रामपंचायतीने थकबाकीदारांची नावे फलकावर जाहीर करण्याचे ठरविले आहे. थकबाकीदार ग्रामस्थांमध्ये प्रतिष्ठित शेतकऱ्यांचा समावेश आहे. ग्रामपंचायतीच्या फलकावर नावे येऊ नये. यासाठी ग्रामस्थांनी थकित पाणीपट्टी जमा करावी. असे आवाहन सरपंच सुरेश मकासरे, उपसरपंच एकनाथ खुळे, ग्रामसेवक राठोड यांनी केले आहे.

हेही वाचा: मोठी बातमी ः शिर्डीचे खासदार सदाशिव लोखंडे यांच्यासह पत्नी-मुलगाही कोरोनाबाधित

वळण गाव प्रतिष्ठित बागायतदार शेतकऱ्यांचे आहे. चहाच्या टपरीवर लाखो रुपयांची उलाढाल होते. एक कप चहाच्या किमतीपेक्षा कमी पैशात एक दिवसाचे शुद्ध, स्वच्छ व भरपूर पिण्याचे पाणी मिळते. ग्रामस्थांनी हक्काबरोबर कर्तव्याची जाणीव ठेवून, पाणीपट्टी भरावी.

- प्रकाश खुळे, नळजोडणी खातेदार, वळण

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :AhmednagarWater Bill
loading image
go to top